Helen Life : बॉलिवूड सिनेमांमध्ये आयटम नंबर करणारी सगळ्यात फेमस अभिनेत्री म्हणून हेलनचं नाव घेतलं जातं. हेलनची अनेक गाणी हिट झाली आणि आजही हिट आहेत. अनेक गाजलेल्या सिनेमात तिने काम केलं आणि आयटम नंबर केले. ती आता सलमान खानची दुसरी आई आहे. सलीम खान यांनी तिच्यासोबत दुसरं लग्न केलं. पण तिचा पहिला पती कोण होता? चला जाणून घेऊ तिच्या पहिल्या लग्नाबाबत...
हेलन एक अशी कलाकार होती जिने सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. तिला हिंदी सिनेमातील आयटम क्वीन मानलं जातं. तिच्या डान्ससमोर मोठमोठ्या हिरोईन्सचा डान्स फिका होता. हेलनला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. ती एक स्टार आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे की, हेलनने सलीम खान यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. कारण ती तिचा पहिल्या लग्नात खूप छळ झाला होता. पहिल्या पतीने तिचा छळ तर केलाच, सोबतच तिला कंगाल केलं.
हेलनचा जन्म बर्मामध्ये झाला होता. तिचे वडील अंग्लो इंडियन होते तर आई बर्माची होती. दुसऱ्या महायुद्धावेळी ते आपलं घर सोडून जंगलाच्या रस्त्याने भारतात आले होते. भारतात आल्यावर घर चालवण्यासाठी लहान वयात हेलनने नर्सचं काम सुरू केलं होतं. त्यानंतर तिच्या आईची भेट कुकू मोरेसोबत झाली. जो एक बॅकग्राउंड डान्सर होता. त्याने हेलनला बॉलिवूडमध्ये आणलं.
हेलनचं गाणं ‘मेरा नाम चिनचिन चू’ सुपरहिट ठरलं. त्यानंतर हेलनने एकापाठी एक हिट गाणी दिली. त्यावेळी सगळ्या डायरेक्टर आणि निर्मात्यांना तिच्यासोबत काम करायचं होतं. करिअर सेट झालं. पण हेलनच्या आयुष्यात 27 वर्षाने मोठा डायरेक्ट प्रेम नारायण अरोरा आला. ती त्याच्या प्रेमात पडली. पीएन अरोरा हेलनपेक्षा 27 वर्षाने मोठा होता आणि हेलन त्यावेळी केवळ 19 वर्षांची होती. दोन वर्षात 1957 मध्ये त्यांनी लग्न केलं.
हेलनचं पहिलं लग्न तिच्या 35 व्या वाढदिवशी मोडलं होतं. हे लग्न केवळ 16 वर्ष चाललं. पीएन अरोरावर आरोप होता की, तो हेलनच्या पैशांवर मजा मारत होता. त्याने हेलनचे सगळे पैसे आपल्या नावावर केले होते आणि हेलन पूर्णपणे कंगाल झाली होती. ज्यामुळे हेलन रस्त्यावर आली. भाडं देण्याचे पैसेही नव्हते म्हणून तिला घर सोडावं लागलं होतं. ज्यानंतर तिने घटस्फोट घेतला. अशात सलीम खान यांनी तिची मदत केली होती.
1973 मध्ये करिना कपूरचे वडील रणधीर कपूर आणि सुलक्षणा पंडित सोबत पीएन अरोरार एक सिनेमा ‘करिश्मा’ बनवत होते. सिनेमाचं शूटींग सुरू झाल्यावर तीन महिन्यांनी पीएन अरोरा यांचं अचानक निधन झालं.