Join us

Bappi Lahiri : बप्पी लहरी यांच्या सोन्याच्या दागिन्यांचं काय होणार? जवळच्या मित्राने केला खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 17:49 IST

Bappi Lahiri Gold : बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी त्यांनी दिली जी आजही लोकप्रिय आहेत. बप्पी दा हे त्यांच्या गाण्यांसोबतच ते त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठीही प्रसिद्ध होते.

बॉलिवूडचे सर्वात पॉप्युलर गायक आणि संगीतकार बप्पी लहरी (Bappi Lahiri Gold) यांचं वयाच्या ६९व्या वर्षीय दु:खद निधन झालं. ते बऱ्याच दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. बप्पी दा यांनी ७० आणि ८० चा काळ आपल्या जबरदस्त गाण्यांनी चांगलाच गाजवला. बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी त्यांनी दिली जी आजही लोकप्रिय आहेत. बप्पी दा हे त्यांच्या गाण्यांसोबतच ते त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठीही प्रसिद्ध होते.

बप्पी लहरी यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांना त्यांच्या आईनेच सांगितलं होतं की, सोनं तुझ्यासाठी लकी ठरेल. तेव्हापासून ते सोन्याचे दागिने वापरत होते. त्यांनी अनेकदा असा दावा केला होता की, जेव्हापासून त्यांनी सोन्याचे दागिने घालणं सुरू केलं तेव्हापासून त्यांचं संगीत सोन्यासारखं चमकू लागलं होतं. त्यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितलं की, बप्पी दा हे त्यांच्या दागिन्यांबाबत फार सिक्योर होते.

सूत्राने इंडिया टुडेला सांगितलं की, बप्पी हा सोनं फार सांभाळून ठेवत होते. बप्पी दा यांच्या एका मित्राने सांगितलं की, 'त्यांचं सोन्यासोबत एक खास आणि पर्सनल रिलेशन होतं. सोन्याचे दागिने घालणं त्यांचा एक सिग्नेचर लूक बनला होता. हा लूक त्यांनी खूप एन्जॉय केला.

बप्पी दा यांच्या मित्राने पुढे सांगितलं की, 'बप्पी दा वेस्टच्या हिप-हॉप आणि आर अॅन्ड बी म्युझिकने फार प्रभावित होते. त्यांना ब्लिंग आणि डायमंड्सबाबत रॅपर्सचं प्रेम माहीत होतं. ते स्वत:लाही हॉलिवूडच्या म्युझिशिअनसारखेच समजत होते. त्याचप्रमाणे दागिने आणि हिऱ्याची चेन घालत होते. हिऱ्यांना ते आइस म्हणत होते.

बप्पी लहरी यांच्या निधनानंतर त्यांच्या दागिन्यांचं काय होणार? याबाबत सूत्राने सांगितलं की, बप्पी दा यांनी अनेक वर्षांपासून चेन, पेंडेंट, अंगठ्या, कडे गणेश मूर्ती, हिऱ्याचे ब्रेसलेट, इतकंच काय तर सोन्याची फ्रेम आणि सोन्याचे कफलिंक जमा केले होते. या सर्वांबाबत सर्वांनाच माहीत होतं. या सर्व वस्तू आता एका ट्रान्सपरंट बॉक्समध्ये ठेवण्यात आल्या आहेत. जे एका कपाटात ठेवण्यात आले आहेत. ते त्यांच्या परिवाराचा भाग आहेत. 

बप्पी दा यांच्या मित्राने सांगितलं की, बप्पी दा यांचा मुलगा बप्पा आणि मुलगी रेमा हे वडिलांची एक एक वस्तू जतन करून ठेवणार आहेत. ते हे दागिने सिक्योर करून ठेवतील. मित्र म्हणाले की, 'परिवार सध्या धक्क्यात आहे. पण ते बप्पी दा यांचे दागिने संरक्षित करण्यासाठी सगळं काही करतील. ते जे जोर घालत होते त्यासाठी एक वेगळा बॉक्स वापरत होते. हे सगळे दागिने त्यांच्या आठवणीत संरक्षित केले जातील'. 

टॅग्स :बप्पी लाहिरीबॉलिवूड