Join us

आलियाची कशी झाली अलाया, सैफ अली खानच्या या अभिनेत्रीची जाणून घ्या इंटरेस्टिंग स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 16:28 IST

अलायाच्या आजोबांची चार लग्न, आईचा घटस्फोट झाला आहे.

बॉलिवूडमध्ये आणखीन एका स्टार किड्सची भर पडणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे पूजा बेदीची मुलगी अलाया फर्नीचरवाला. ती अभिनेता सैफ अली खान व तब्बू यांच्यासोबत 'जवानी जानेमन'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. अलायाचं खरे नाव आलिया फर्नीचरवाला आहे. पण नुकतेच तिने तिचे नाव बदललं आहे. 

अलाया फर्नीचरवाला हिने तिचे नाव का बदलले हे सांगितलं, ती म्हणाली की, आमच्या इंडस्ट्रीत आधीच लाजवाब आलिया भट आहे. जिची मी खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे त्याच नावाने करियर सुरू करण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे जसे रणबीर व रणवीर आहे तसेच आलिया अलाया झाली. 

आई वडील यांच्या घटस्फोटावरही अलायाने आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, जेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला त्यावेळी ते ओपनली बोलले. माझे काही प्रश्न होते त्याचे उत्तर दिले होते. ते जास्त खूश होते. मला आठवत नाही की माझे पालक विवाहीत कधी होते कारण मी त्यावेळी ५ वर्षांची होती. जेव्हा ते विभक्त झाले.

तर मी हेच जीवन पाहिले आहे आणि माझे लाइफवर खूप प्रेम आहे. तर मला बर्थडेला दोन दोन गिफ्ट्स मिळत असतात.

सर्व सेलिब्रेशन दोनदा होते. माझ्या आजोबांचे ४ लग्न झाले आहेत आणि तीन वेळा घटस्फोटो झाला आहे. पण मला अजिबात फरक पडत नाही, असे अलायाने सांगितले.

टॅग्स :पूजा बेदीसैफ अली खान तब्बू