अक्षय कुमार हा बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जातो. अक्षयचा आगामी 'बडे मिया, छोटे मिया' सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने अक्षय विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. यादरम्यान अक्षयने भारत सरकारला एक खास विनंती केलीय. कुठेही अडचण आली तर आपण अमेरिकेची मदत मागतो, पण आता काही संकट आलं तर भारताने पुढे यावे. नेमकं काय म्हणाला अक्षय?
अक्षय कुमार प्रमोशनदरम्याान म्हणाला, "आम्ही लहानपणापासून चित्रपट पाहत आलो आहोत आणि आम्हाला दाखवण्यात आले आहे की, कुठे जर दहशतवादी हल्ला झाला तर अमेरिका आम्हाला वाचवायला येते. कारण आम्ही हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिले आहे की, हल्ला झाला तर अमेरिका बचावाला येते. पण मला ते बदलायचे आहे. यापुढे काहीही झाले तर भारत इतरांच्या मदतीला येईल. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की, आमच्या भारतीय सैनिकांनाही संधी द्यावी. म्हणजे आपणही इतरांना संकटापासुन मुक्त करु शकतो"
अक्षय कुमारने केलेल्या विधानाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. अक्षय कुमार - टायगर श्रॉफचा 'बडे मिया छोटे मिया' सिनेमा ईदला रिलीज होतेय. या सिनेमात साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भुमिकेत झळकणार आहे. याशिवाय अभिनेत्री मानुषी छिल्लर सुद्धा सिनेमात विशेष भूमिकेत झळकणार आहे. सर्वांना या अॅक्शनपॅक सिनेमाची उत्सुकता आहे.