बॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ रिलीज होऊन २६ वर्षे झाली आहेत. मात्र, आजही प्रेक्षक हा सिनेमा टीव्हीवर किवा ऑनलाइन आवर्जून बघतात. सिनेमाच्या स्टोरीपासून ते प्रत्येक भूमिकेपर्यंत ९०च्या काळातील लोकांच्या भावना जुळल्या आहेत.
मग तो राज आणि त्याच्या वडिलातील मैत्री असो किंवा सिमरन आणि तिच्या रागीट बाबूजीचं नातं असो. दोघांनाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. पण या सिनेमात सिमरनचे वडील बलदेव नेहमीच रागाच्या मूडमध्ये का असतात हे कुणालाच माहीत नाही. याचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय.
बलदेव सतत रागात का असतो याचं उत्तर DDLJ च्या एका डिलीट केलेल्या सीनमध्ये सापडलं. बलदेव पंजाबहून येऊन लंडनमध्ये एक जबरदस्ती जीवन जगत असतो. कारण त्याच्यासोबत मोठा दगा झालेला असतो.
बलदेव आपल्या परिवारासोबत लंडनला आपल्या एका मित्राच्या सांगण्यावरून येतो. मित्राने बलदेवला नोकरीचं आश्वासन दिलेलं असतं. त्याचा परिवार कर्ज घेऊन त्याला लंडनला पाठवतो. पण लंडनला गेल्यावर त्याला समजलं की, नोकरी तर आहेच नाही. आणि त्याचा मित्र नरेंदर त्याला दगा देऊन आफ्रिकेला पळून गेला आहे.
यानंतर बलदेवला परिवारासोबत लंडनमध्ये जागोजागी भटकावं लागलं. यामुळे त्याचा स्वभाव चिडका झाला आहे. तो त्याच्या परिवारासाठी आपलं मन मारून तिथे राहत होता. पण त्याचं मन पंजाबात होतं. DDLJ च्या डिलीट केलेल्या सीनमध्ये तुम्ही हे बघू शकता.