Join us

अनन्या पांडेने शिक्षण अर्धवट का सोडलं? आईने केला खुलासा, म्हणाली- "आम्हाला धक्का बसला पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 14:06 IST

अनन्या पांडेच्या आईने लेकीने शिक्षण अर्धवट का सोडलं याविषयी खुलासा केलाय (ananya pandey)

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे. अनन्याने 'स्टूडंट ऑफ द इयर २' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनन्याने मागे वळून पाहिलं नाही. 'गेहराईया', 'पती,पत्नी और वो', 'लायगर', 'ड्रीम गर्ल २', 'खो गए हम कहा' अशा सिनेमांमधून अनन्याने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. अनन्याच्या आईने अलीकडेच अमेरिकेत शिकत असलेल्या लेकीने शिक्षण अर्धवट का सोडलं? याचा खुलासा केला. 

अनन्याची आई भावना पांडे यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. अनन्याने शालेय शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी परदेशी जायचा निर्णय घेतला. तिला लॉस एंजेलिस येथील चांगल्या कॉलेजमध्ये मास मीडियाचं शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. अनन्या कॉलेजचं शिक्षण घेत होती. त्यावेळी 'स्टूडंट ऑफ द इयर २' सिनेमाचे दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा एका नवोदित अभिनेत्रीच्या शोधात होते. त्यावेळी त्यांनी भावना यांच्याकडून अनन्या सिनेमात काम करेल का? ही विचारणा केली.

त्यावेळी अनन्या कॉलेज करत होती. पुनीतने भावना यांना विनंती करुन "अनन्याने ऑडिशन दिली तर बरं होईल", असं सांगितलं. त्यानंतर अनन्याने ऑडिशन देण्याचा निर्णय घेतला. नंतर अनन्याचं 'स्टूडंट ऑफ द इयर २'साठी सिलेक्शन झालं. त्यानंतर मात्र अनन्याने भारतात राहून अभिनय क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. सुरुवातीला अनन्याचा कॉलेज सोडण्याच्या निर्णयाने तिच्या आई-बाबांना धक्का बसला. पण त्यानंतर मात्र त्यांनी लेकीच्या निर्णयाला पाठिंबा द्यायचं ठरवलं.

 

टॅग्स :अनन्या पांडेस्टुडंट ऑफ द इअर 2