Join us

सोनम कपूरबद्दल भाऊ अर्जुन कपूर का आहे प्रोटेक्टिव्ह?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2017 7:12 AM

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची सोनम कपूर ही सगळ्यात आवडती बहिण आहे.  अर्जुन म्हणाला मी सोनमला घेऊन खूप प्रोटेक्टिव्ह आहे. ...

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची सोनम कपूर ही सगळ्यात आवडती बहिण आहे.  अर्जुन म्हणाला मी सोनमला घेऊन खूप प्रोटेक्टिव्ह आहे. अर्जुन कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट मुबारकांच्या प्रमोशनमध्ये व्सस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याला एक प्रश्न विचारण्यात आला याचे उत्तर देताना तो म्हणाला, ''सोनम माझी सगळ्यात आवडती चुलत बहिण आहे. आमच्या दोघांचे शिक्षण एकाच शाळेत झाले आहे. सुरुवातीपासून मी तिच्या बाबातीत प्रोटेक्टिव्ह आहे आणि नेहमीच असेन.''  अर्जुन कपूरचा काका अभिनेता अनिल कपूरने त्याला त्याच्या चुलत भावंडं असलेल्या सोनम, रिया आणि हर्ष यांच्यामधून एकाची निवड करायला सांगितली होती. त्यावेळी त्यांने सोनमचे नाव घेतले. अनिल कपूरने अर्जुनला दुसरा प्रश्न कपूर खानदानकडून मिळालेल्या गुणा संबंधी केला. यावर तो म्हणाला, ''मला चित्रपटांवर आणि प्रेक्षकांवर नेहमी प्रेम करत राहायचे आहे. आमच्या कुटुंबीयांप्रमाणे आमचे चित्रपटावर प्रेम असते. मी कुटुंबीयांनकडून एक गोष्ट नक्कीच शिकलो आहे तुम्हाला नेहमीच प्रेक्षकांची सेवा करत राहायचे आहे. कारण तुम्हाला मिळालेले यश हे त्यांच्यामुळेच असते.''   ALSO READ : ​अनिल कपूर करणार पुतण्या अर्जुन कपूरच्या लग्नासाठी प्रयत्न ! वाचा इंटरेस्टिंग डिटेल्स!! अनीस बज्मी दिग्दर्शित 'मुबारकां' मध्ये अर्जुन कपूर आणि अनिल कपूर एकत्र दिसणार आहे. या दोघांशिवाय इलियाना डिक्रूझ आणि अथिया शेट्टी पण यात  झळकणार आहेत. मुबारकांमधले 'द गोगल साँग' हे गाणं प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरले आहे. हे गाणे ८० च्या दशकात असलेल्या गाण्याचा रिमिक्स आहे. या गाण्याचे नवे व्हर्जन मिका सिंहने गायले आहे. 28 जुलैला 'मुबारकां' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.