Join us  

"तुझ्यासोबत हा शेवटचा सिनेमा", असं अक्षय कुमार करीना कपूरला का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 6:07 PM

Akshay Kumar And Kareena Kapoor :अक्षय कुमारने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरसोबत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही जोडी शेवटची 'गुड न्यूज' चित्रपटात दिसली होती.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'खेल खेल में' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, आम्ही तुमच्यासाठी त्याच्या आणि करीना कपूर(Kareena Kapoor)बद्दलचा एक रंजक किस्सा सांगणार आहोत. वास्तविक, अक्षय कुमारने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरसोबत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही जोडी शेवटची 'गुड न्यूज' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान असे काही घडले की, अक्षय त्याची सहकलाकार करीनावर चिडला. हा माझा तुझ्यासोबतचा शेवटचा चित्रपट असल्याचेही त्याने अभिनेत्रीला सांगितले. 

ही घटना आहे जेव्हा अक्षय कुमार, करीना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ त्यांच्या 'गुड न्यूज' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले. यावेळी करीना कपूरने शोमध्ये असे काही केले होते की अक्षय कुमार चांगलाच संतापला आणि त्याने करीनाला सांगितले की हा तुझा माझ्यासोबतचा शेवटचा चित्रपट आहे. खरेतर करीनाने शोमध्ये कपिल शर्मासोबत खूप धमाल केली होती. दरम्यान, तिने अक्षयला स्वतःपासून दूर केले आणि कपिल शर्माला बाजूला बसवले. अभिनेत्याला हे अजिबात आवडले नाही आणि त्याने करीनाला धमकावले की हा तुझा माझ्यासोबतचा शेवटचा चित्रपट आहे. 

अक्षय आणि करीनामध्ये खरंच दुरावा निर्माण झाला आहे का?

अक्षय कुमार इथेच थांबला नाही, त्याने करीना कपूरला पुढे सांगितले की, आता तू फक्त कपिल शर्मासोबतच चित्रपट कर. आता तुम्ही विचार करत असाल की अक्षय आणि करीनामध्ये खरंच दुरावा निर्माण झाला आहे का, पण काळजी करू नका, अक्षयने हे सर्व गमतीत म्हटले होते. यानंतर हे सर्वजण शोमध्ये एकत्र खूप मस्ती करताना दिसले. 

वर्कफ्रंट

आता अक्षय कुमार 'खेल खेल में'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तापसी पन्नू, वाणी कपूर आणि पंजाबी अभिनेता एमी विर्क दिसत आहेत. करीना कपूरबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री शेवटची 'द क्रू' चित्रपटात दिसली होती. आता लवकरच ती 'द बकिंघम मर्डर्स'मध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारकरिना कपूर