Join us  

कंगना राणौतला तिचा मुंबईतील बंगला का विकावा लागला?, अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 12:50 PM

Kangana Ranaut : कंगना राणौतने नुकताच तिचा मुंबईतील बंगला विकला आहे ज्यामध्ये तिचे ऑफिस होते. आता कंगनाने ऑफिस विकण्यामागचे कारण सांगितले आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ (Emergency Movie) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट पुढे ढकलल्यामुळे कंगना चांगलीच संतापली आहे. दरम्यान, तिला तिचा मुंबईतील बंगला विकावा लागला, जो एकेकाळी बीएमसीने जमीनदोस्त केला होता. कंगनाने हा बंगला ३२ कोटी रुपयांना विकला आहे. आता कंगनाने हा बंगला विकण्यामागचे कारण सांगितले आहे. 

कंगना राणौतने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'माझा चित्रपट रिलीज होणार होता. या चित्रपटासाठी मी माझी सर्व वैयक्तिक मालमत्ता गुंतवली होती. आता ते रिलीज होत नाही आहे. संकटकाळासाठी उपयोगी येत तिच खरी मालमत्ता असते.'

BMCने बुलडोझर चालवला होताकंगनाचा हा बंगला वांद्रे येथील पाली हिल्समध्ये होता. जी तिने २०१७ मध्ये २० कोटींना खरेदी केली होती. २०१९ मध्ये तिने या बंगल्यात मणिकर्णिका फिल्मचे कार्यालय सुरू केले. एका वर्षानंतर, २०२० मध्ये, बीएमसीने बंगल्याचा बेकायदेशीर भाग पाडला. या तोडफोडीची भरपाई मिळावी, असे कंगनाने सांगितले होते, पण हा करदात्यांच्या पैशांमुळे तिने हा विचार सोडून दिला. कंगनाने अंधेरीमध्ये १.५६ कोटींना नवीन ऑफिसही विकत घेतले आहे.

'इमर्जन्सी' चित्रपटाबाबतकंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर हा ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता मात्र सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने त्याचे प्रदर्शन थांबवण्यात आले. कंगनाने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपट पुढे ढकलल्याची माहिती दिली होती. कंगनाने लिहिले होते की, जड अंतःकरणाने मी जाहीर करते की, माझ्या दिग्दर्शित 'इमर्जन्सी' हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे, आम्ही अजूनही सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची वाट पाहत आहोत, तुमच्या समजुतीपणा आणि संयमाबद्दल धन्यवाद.

टॅग्स :कंगना राणौत