Join us

लग्नानंतर माधुरी दीक्षितने अ‍ॅक्टिंगला का केला होता रामराम? यावर आता 'धकधक गर्ल' म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 12:31 PM

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितने १९९९ साली डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न केले. त्यानंतर ती अभिनय सोडून बरेच वर्ष परदेशात स्थायिक झाली होती.

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)ने तिचे पती श्रीराम नेने (Dr.Shriram Nene) यांच्यासोबत कुटुंबासाठी वेळ देण्यासाठी कामातून ब्रेक घेण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल नुकताच खुलासा केला आहे. 'किसका ब्रांड बजेगा' वरील संभाषणादरम्यान माधुरीने तिच्या निर्णयाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, माझ्यासाठी हे एका स्वप्नांपैकी एक आहे जे मी स्वतः पाहिले होते. माधुरीने १९९९ मध्ये लॉस अँजेलिसमधील कार्डिओव्हस्कुलर सर्जन श्रीराम नेनेंशी लग्न केले.

माधुरी आणि श्रीराम नेने यांनी २००३ मध्ये अरिन नावाच्या त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आणि त्यानंतर दोन वर्षांनंतर त्यांचा दुसरा मुलगा रायनचा जन्म झाला. माधुरी म्हणाली की, कुटुंब बनवणे आणि मुले होणे ही एक अशी गोष्ट आहे ज्याची ती नेहमीच आतुरतेने वाट पाहत होती. २०२२ साली 'द फेम गेम'मधून अभिनयात पुनरागमन करणारी माधुरी दीक्षित म्हणाली की, काम सोडून कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेणे सोपे नाही.

माधुरीने दिलेत बॉलिवूडला डझनभर सुपरहिट चित्रपट माधुरी दीक्षित ९० च्या दशकातील सर्वात सुपरहिट हिरोईन होती. माधुरी दीक्षितने बॉलिवूडला डझनभर सुपरहिट चित्रपट दिले आहेत. माधुरी दीक्षितच्या डान्स आणि स्टाइलचे लोकांना वेड लागले होते. ती आजही लोकांना खूप आवडते. माधुरी अजूनही चित्रपट आणि सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे.

टॅग्स :माधुरी दिक्षित