बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आपल्या फिल्मी करिअरपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. सैफ अली खानचा पदार्पणाचा चित्रपट परंपरा रिलीज झाला नव्हता तेव्हाच त्याचे सीनिअर अभिनेत्री अमृता सिंगवर प्रेम जडले होते. दोघांची भेट एका फोटोशूटदरम्यान झाली होती आणि मग त्यांच्यात जवळीक वाढली होती. २० वर्षीय सैफ अली खानने ३२ वर्षीय अमृता सिंगला आपली जीवनसाथी बनविले. मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. दोघांनी १९९१ साली लग्न केले होते आणि २००४ साली विभक्त झाले होते.
लग्न तुटण्यामागे दोघांच्या वयातील अंतर म्हटले जाते. अमृता वयाने सैफपेक्षा मोठी असल्यामुळे त्यांच्यात सामंजस्य नव्हते आणि ते वेगळे झाले. त्यानंतर सैफ अली खानने स्वतःपेक्षा वयाने १२ वर्षे लहान करीना कपूरसोबत लग्न केले. सैफ अली खानने एका मुलाखतीत वयाने लहान असणाऱ्या करीनाशी लग्न करण्याबाबत खुलासा केला. त्याने पहिल्या लग्नात कोणत्या गोष्टी मिस केल्या ते सांगितले होते.
सैफने पुरूषांना वयाने लहान असणाऱ्या महिलेशी लग्न करण्याचा सल्ला देत सांगितले की, मी सर्व पुरूषांना सल्ला देऊ इच्छितो की वयाने लहान असणाऱ्या महिलेसोबत लग्न करा. अशा व्यक्तीशी लग्न करणे चांगले असते जो फन लविंग आहे, सुंदर आणि नॉन जजमेंटल असेल. या तीन गोष्टी गरजेच्या आहेत. विशेष करून करीना कपूरमध्ये या तिन्ही गोष्टी आहेत, ज्यामुळे सैफने तिच्याशी लग्न केले.