80 चं दशक गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी (hema malini). आज हेमा मालिनी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी, त्यांच्या करिअरविषयी अनेक गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. हेमा मालिनी यांच्या बर्थ डे पार्टील संपूर्ण बॉलिवूड जमलं होतं. सलमान खान, रेखा. जुही चावला. रवीना टंडनपासून, राणी मुखर्जी आणि माधुरी दीक्षितपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र यासगळ्यात चाहते हेमा मालिनी यांच्या सावत्र मुलांना शोधत होते.
हेमा मालिनी यांच्या बर्थ डे पार्टीला धर्मेंद्र, प्रकाश कौर, सनी देओल आणि बॉबी देओल यापैकी कुणीच आलं नव्हते. त्यामुळे हेमा मालिनी यांनी देओल कुटुंबीयाला बर्थ डेचे आमंत्रण दिले की नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, हेमा मालिनी यांनी आपल्या दोन्ही सावत्र मुलांना बर्थ डे पार्टीला बोलवलं होते. पण सनी देओल आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये इतका बिझी होता की तो आपल्या व्यस्त शेड्यूलमधन वेळ काढू शकला नाही. त्यामुळे तो सावत्र आईच्या बर्थ डे पार्टीला पोहोचू शकला नाही. हेमा आणि सनी देओलमधील बॉन्डिंग खूपच खास आहे. दोघांमध्यो कोणतेच मतभेद नाहीत. इतकंच नाही तर सनी देओलने सावई आईच्या वाढदिवसाला फुलांचा गुच्छ पाठवला होता.
ईशाचं सनी आणि बॉबीसोबत जवळचं नातं आहे. ती त्यांना राखीही बांधते. गदर २चं स्पेशल स्क्रिनिंग ईशा देओलने स्वत:च्या घरी ठेवत सगळ्यांची बोलती बंद केली होती. तेव्हा चारही भावडं एकत्र दिसले होते.