बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput)च्या निधनापासून पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले आहेत. तिने आधीच्या आणि आताच्या जीवनात झालेल्या बदलाबद्दल सांगितले. आधी तिला वयाच्या ३१व्या वर्षी तिला ८१ वर्षांची वयस्कर महिला असल्यासारखे वाटत होते. आता ती थेरपीच्या माध्यमातून आयुष्याची नव्याने सुरुवात केली आहे.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२३मध्ये राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना रिया चक्रवर्तीने सांगितले की, जीवन एक सर्कस आहे. आता मी मीडियाशी बोलत आहे. जीवन पुढे जात आहे. नवीन मी खूप वेगळी आहे. पहिली ३१ वर्षांच्या वयात मला आतून ८१ वर्षांची वयस्कर महिला असल्याचे वाटत होते. कठीण काळात तुम्ही देवदास बनू शकता किंवा थेरेपीचा आधार घेत नवीन आयुष्याची सुरुवात करु शकता. मी थेरेपीचा आधार घेतला आहे.
''मी लोकांचे चेहरे वाचू शकते..''रिया म्हणाली की, तिच्या आतला आवाज तिला सांगतो की सर्व काही ठीक होईल. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमध्ये तिची काही भूमिका होती का या प्रश्नावर, अभिनेत्रीने उत्तर दिले की जेव्हा ती लोकांच्या चेहऱ्याकडे पाहते तेव्हा असे वाटते की काही लोक तिच्याकडे पाहत आहेत जणू तिने काहीतरी केले आहे. ती म्हणाली, 'मी लोकांचे चेहरे वाचू शकते. चुडेल हे नाव मला आवडले आणि माझी हरकत नव्हती. सुशांत सिंगच्या आत्महत्येबाबत रिया म्हणाली की, त्याने असे का केले हे तिला माहीत नाही. पण तो कोणत्या परिस्थितीतून गेला आहे हे तिला माहीत आहे.
२०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली होती. अशा स्थितीत रिया चक्रवर्तीला त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवण्यात आले होते. रिया आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर रियाला तुरुंगात जावे लागले आणि सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला जावे लागले.