Join us  

श्रद्धा कपूरने का केलं नाही सलमान, शाहरूख आणि आमिरसोबत काम, म्हणाली - "मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 3:09 PM

Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री २मुळे चर्चेत आहे. फक्त ५० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री २' (Stree 2)मुळे चर्चेत आहे. फक्त ५० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. श्रद्धाने या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत हिंदी सिनेसृष्टीतील तीन खान म्हणजेच सलमान खान (Salman Khan), शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि आमिर खान(Aamir Khan)सोबत काम का केलं नाही, यावर भाष्य केले. 

शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर बोलताना अभिनेत्री श्रद्धा कपूरने सांगितले की, तिला सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत चित्रपटांची ऑफर आली होती परंतु काही कारणांमुळे ती या तिघांपैकी कोणाशीही काम करू शकली नाही. ती म्हणाली, 'अनेकदा तुम्हाला चित्रपटाची ऑफर दिली जाते, परंतु जर तुम्हाला असे वाटत असेल की ते पात्र तितकेसे रोमांचक नाही किंवा ते पात्र तुमच्यातील कलाकाराला आव्हान देत नाही, तर तुम्ही ते पात्र सोडून द्या. मी स्वतःसाठी निवडलेल्या कामाबद्दल अगदी स्पष्ट आहे.

'मला चांगल्या चित्रपटांचा भाग व्हायचे आहे'श्रद्धा पुढे म्हणाली, 'मला चांगल्या चित्रपटांचा भाग व्हायचे आहे, चांगल्या कथांसह मनोरंजक चित्रपट बनवायचे आहेत, चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे आणि चांगले काम करायचे आहे. या सगळ्याचा अर्थ चांगल्या अभिनेत्यांसोबत किंवा मोठ्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी असेल तर मला हो म्हणायला आनंद होईल.

२०० कोटींचा दुसरा चित्रपटतब्बल १६ महिन्यांनंतर बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करणाऱ्या श्रद्धाने 'स्त्री २' द्वारे सलग दुसरा २०० कोटींचा चित्रपट दिला आहे. पहिला चित्रपट म्हणजे 'तू झुठी मैं मक्कर' ज्यामध्ये तिने सुपरस्टार रणबीर कपूरसोबत काम केले होते. sacnilk नुसार, 'स्त्री २'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर २७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. जगभरातील ४०० कोटी रुपयांपर्यंत कमाई केली आहे.

'खेल खेल में' आणि 'वेद'ला स्त्री २नं टाकलं मागेस्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेला 'स्त्री २'ची मल्टीस्टारर 'खेल खेल में', जॉन अब्राहम-स्टार 'वेदा' आणि तेलुगू चित्रपट 'डबल iSmart' यांच्याशी टक्कर झाली आणि त्या सर्वांना मागे सोडण्यात यशस्वी झाला. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'कल्की 2898 एडी' नंतर उत्तम कलेक्शन करणारा हा या वर्षातील दुसरा चित्रपट ठरला आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरसलमान खानशाहरुख खानआमिर खान