Join us  

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh : पापाराझींना पाहताच रितेश-जिनिलियाची मुलं का जोडतात हात?, अभिनेता खुलासा करत म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 7:52 PM

Riteish Deshmukh : रितेश देशमुख सध्या त्याचा आगामी 'काकुडा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हाही दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट १२ जुलैला ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. याशिवाय तो पिल सीरिजमध्येही दिसणार आहे.

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याचा आगामी 'काकुडा' (Kakuda Movie) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha)ही दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट १२ जुलैला ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. याशिवाय तो 'पिल' (Pill) सीरिजमध्येही दिसणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याची मुले पापाराझींसमोर नेहमी हात का जोडतात, यामागचं कारण सांगितले आहे.

बऱ्याचदा, सिनेइंडस्ट्रीतील कलाकार किंवा स्टार किड्स पाहिल्यावर, पापाराझींसमोर पोज देताना दिसतात. पण जिनिलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची मुलं असं कधीच करत नाहीत. त्यांची दोन्ही मुले पापाराझींसमोर अनेकदा हात जोडताना दिसतात. आता रितेशने खुलासा केला आहे की त्याची मुले पॅप्स पाहताच हात का जोडतात.

या कारणांमुळे रितेश-जिनिलियाची मुलं पापाराझींसमोर जोडतात हात

रितेश देशमुख एका मुलाखतीदरम्यान त्याच्या मुलांबद्दलही बोलले. बॉलिवूड लाइफशी झालेल्या मुलाखतीत रितेशने सांगितले की, त्याची मुले अनेकदा फोटोग्राफर्सना पाहून त्यांना अभिवादन का करतात, 'पापाराझी आमचे फोटो काढायचे आणि आमची मुले अनेकदा असे का करतात असे विचारायचे. मग मी त्यांना म्हणालो की, पापाराझींना वाटते की मी अनेक वर्षांपासून अभिनय करत आहे त्यामुळे त्यांनी माझे फोटो क्लिक करावेत. पण तुम्ही आजवर असे काही केले नाही, तरीही ते तुमचे फोटो क्लिक करतात. त्यामुळे त्यांना हात जोडून नमस्कार करावा.

पिलमध्ये दिसणार रितेश पिल सीरिजमध्ये रितेश सीडीएससीओ अधिकारी प्रकाश चौहानच्या भूमिकेत दिसत आहे. तो औषध कंपन्यांचे काळे धंदे बंद करतो. पिल सीरिज फार्मास्युटिकल घोटाळ्यांवर आधारित आहे. याशिवाय तो सोनाक्षी सिन्हासोबत काकुडा या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात साकिब सलीमही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी थेट OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा