Join us  

​मर्यादा महिलांनीच का पाळायची?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2016 11:28 AM

‘वन नाईट स्टँड’च्या निमित्ताने सनी लिओनची सीएनएक्सला विशेष मुलाखतआपला समाज अजूनही पुरुषी मानसिकतेतून बाहेर पडलेला नाही. लिंगभेदाचा आजार ...

‘वन नाईट स्टँड’च्या निमित्ताने सनी लिओनची सीएनएक्सला विशेष मुलाखतआपला समाज अजूनही पुरुषी मानसिकतेतून बाहेर पडलेला नाही. लिंगभेदाचा आजार आजही आपल्या समाजात होता तसाच कायम आहे. एखादी गोष्ट पुरुष करीत असेल तर त्याला मनाई नाही आणि तीच गोष्ट महिला करीत असेल तर मात्र हजार बंधणे घातली जातात. विधायक कामात गुंतलेल्या महिलेकडेही वेगळ्या नजरेने पाहिले जाते. मर्यादा या महिलांनीच पाळायच्या असतात, असे चित्र जाणीवपूर्वक निर्माण केले जाते हे योग्य नाही, असे रोकठोख मत अभिनेत्री सनी लिओन हिने व्यक्त केले. ‘वन नाईट स्टँड’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तिने सीएनएक्सशी खास बातचित केली.वन नाईट स्टँडविषयी काय सांगशील?हा खरचं एक वेगळा चित्रपट आहे. एका रात्रीनंतर या चित्रपटाचे कथानक सुरू होते. दोन पात्रांमधील संबंधांची आणि त्यांच्या कुटुंबाची ही कथा आहे. या चित्रपटातून आम्ही पुरुष-महिलांच्या समान अधिकारावर भाष्य केले आहे. या चित्रपटात तुझी काय भूमिका आहे?या चित्रपटात मी अशी व्यक्ती आहे, जी एक रात्र राहते. माझ्या मतानुसार हे अत्यंत नाजूक स्वरुपाचे पात्र आहे. या चित्रपटाच्या प्रत्येक दश्यात नायिकेला भोगाव्या लागणाºया परिणामाची कल्पना येते. या चित्रपटात नायिकेने घेतलेल्या कडक भूमिकेमुळे नायकाला परत यावे लागते. ती विचारते, ‘ज्यावेळी तू जे काही केले, तेच मी देखील केले असताना मग चूक काय? आता तू मला कोणत्या गोष्टीचा त्रास देतो आहेस? या भूमिकेसाठी तू काय तयारी केलीस?मी दोन आठवडे या चित्रपटातील संवाद आणि पात्राबाबत चर्चा केली. कथेतील सात ते आठ विविध पात्रांबाबत माहिती घेतली. चित्रपटाची दिग्दर्शिका जस्मीन आणि मी पात्रांबाबत अनेक वेळा बोललो, कोणत्या गोष्टी बदलाव्यात याचीही माहिती घेतली. तिने मला या संपूर्ण कथानकाबाबत विश्वासात घेतले. सेटवर आम्ही खूप चर्चा केली, तिला ते का आवडतं यावरही आम्ही बोललो. याचा नक्कीच चांगला फायदा झालेला दिसेल.चित्रपटात तुला नेमके काय आवडले?मला थ्रिलर, साय-फाय आवडते. मला मसाला फिल्मही खूप आवडतात. प्रामुख्याने मला चित्रपट आवडतात. लोक आपल्या कथा सांगतात, हेच मला आवडते.तू नेहमीच अभिनेत्री राहणार आहेस?मी संपूर्ण विचार करुनच मनोरंजनाचा भाग बनले आहे. मला वाटत नाही, ते सहज शक्य आहे. मला मिळणाºया संधीचा मी नेहमीच उपयोग करीत आली आहे. पुढेही करीत राहणार आहे.पहिल्यांदाच दिग्दर्शन केलेस, तुला भीती वाटत नाही?जस्मीनबाबत तर नाही. या चित्रपटाशी करार करण्यापूर्वी मला तनुजबाबत काहीही माहिती नव्हते. मला वाटते त्याने भूमिकेला वाव दिला आहे. या चित्रपटातील पात्राला न्याय देण्याचा त्याचा प्रयत्न खूपच चांगला आहे.या चित्रपटात कोण असावे, याबाबत तू काही सूचना केल्या होत्या का?नाही. मी त्यांच्यावरच सर्वकाही सोडून दिले होते. तनुजला घेण्याचा निर्णय जस्मीनचा होता. मला वाटते, प्रत्येक गोष्टीमागे कारण असते. जेव्हा लोक हा चित्रपट पाहतील, त्यावेळी भूमिकेचे कौतुक करतील.तू दिग्दर्शक आहेस की अभिनेत्री?प्रत्येक वेळा नवीन करण्याची माझी भूमिका असते, मी काही सूचनाही करते. या चित्रपटात मी सहज भूमिका केली आहे, असे नेहमीच घडत नाही. काही दिग्दर्शकांच्या सूचना वेगळ्या असतात. जस्मीनची भूमिका मला आवडली.तुझा आगामी चित्रपट कोणता आहे?नाव आता नाही सांगणार. येत्या आठवड्यात मी शूटिंगला सुरुवात करीन. यावर्षी माझा आणखी एक चित्रपट येतो आहे. आणखी दोन चित्रपटात मी काम करते आहे.