Join us

साऊथची अभिनेत्री साई पल्लवी का घालत नाही शॉर्ट कपडे? कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 18:29 IST

Sai Pallavi : साऊथ सिनेइंडस्ट्रीतील काही प्रसिद्ध अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री साई पल्लवी.

साऊथ सिनेइंडस्ट्रीतील काही प्रसिद्ध अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi). समांथा, रश्मिका सारख्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये साई पल्लवीच्या नावाचादेखील समावेश आहे. सुंंदर अभिनयाने तिने कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्याचप्रमाणे साधी राहणी, नो मेकअप लुकने तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. इतर अभिनेत्रींपेक्षा साई पल्लवी नेहमीच वेगळी ठरली आहे. ते म्हणजे तिच्या कपड्यांच्या स्टाईलमुळे आणि साधेपणामुळे.

साई पल्लवी नेहमीच कॉटनचे ड्रेस किंवा साड्यांमध्ये सिंपल लूकमध्ये दिसते. सोशल मीडियावर देखील तिचा हाच लूक पाहायला मिळतो. इतर अभिनेत्री आपल्या सौंदर्याने रसिकांचे लक्ष वेधून घेत असतात. तसेच वेस्टर्न कपडे, बिकिनी सारख्या ट्रेंडमध्ये साई पल्लवीने स्वत:ला इतके साधं का ठेवले यामागे देखील कारण आहे. 

अभिनेत्री साई पल्लवी हिने एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार तिच्याबरोबर एक घटना घडली त्यानंतर तिने तोकडे किंवा शॉर्ट कपडे घालणे बंद केले. ती म्हणाली की, त्या व्हिडीओवर माझ्या कपड्यांवरून फार घाणेरड्या आणि अश्लील कमेंट्स होत्या. ते पाहून मला खूप वाईट वाटले. त्यानंतर मी ठरवले की यापुढे तोकडे कपडे घालणार नाही.प्रेक्षकांमध्ये साई पल्लवीची खूप क्रेझ आहे. इन्स्टाग्रावर तिला ७ मिलियन लोक फॉलो करतात. 

टॅग्स :साई पल्लवी