Join us

गोविंदाने का साईन केले होते एकाचवेळी ४९ सिनेमे?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 10:44 AM

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या गोविंदा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. एकेकाळी याच गोविंदाने एकाचवेळी ४९ चित्रपट साईन केले होते. ऐकायला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे.

ठळक मुद्देगोविंदाचा पहिला चित्रपट ‘इल्जाम’ होता. हा चित्रपट १९८६ मध्ये आला होता. या चित्रपटात गोविंदाच्या अपोझिट नीलम, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, प्रेम चोप्रा आणि अनिता राज होते.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या गोविंदा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. एकेकाळी याच गोविंदाने एकाचवेळी ४९ चित्रपट साईन केले होते. ऐकायला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे.

अलीकडे एका कार्यक्रमात गोविंदाने यामागचे कारण सांगितले. त्याने सांगितले की, ‘त्या काळात काम मिळायचे नाही. निर्माते येणार आणि भेटणार, याची आम्ही वाट बघायचो. मी या प्रथेत थोडा बदल केला. मी व्हिडिओ बनवला आणि तो पहलाज निहलानी यांना पाठवला. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी मला हिरो बनवले. मग मी ४९ चित्रपट साईन केले. यानंतर मी कधीच मागे वळून बघितले नाही. काम मिळत नाही, अशा काळात ते मिळयतं म्हटल्यावर मी काय सोडायचे? मी घाबरून एकाचवेळी ४९ चित्रपट साईन केले, असे लोकांनी म्हटले काय आणि नाही म्हटले काय, मला पर्वा नव्हती. पण माझा फंडा कामी आला. पुढे एक टप्पा असाही आला की, गोविंदाचा चित्रपट बनणार नसतील तर फिल्म लाईनचं बंद होईल. मी नंबर गेमवर विश्वास ठेवत नाही. परमेश्वराच्या आशीर्वादाने मी स्टार झालो. पण मी कधीही डोक्यात हवा जावू दिली नाही. माझे पाय जमिनीवरच राहिले. आजही जमिनीवरचं आहेत.’

१४ वर्षांच्या वयात मी नकारही पचवला, असेही त्याने सांगितले. मी माझा पहिला चित्रपट करायला गेलो, तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. त्यावेळी मला नाकारले गेले. तू ना बच्चा वाटतं, ना तरूण, असे मला म्हटले गेले. त्यावेळी मी कामासाठी धडपडत होतो. कारण एकचं होते, मला माझ्या आईची मदत करायची होती.

तुम्हाला ठाऊक असेलचं की, गोविंदाचा पहिला चित्रपट ‘इल्जाम’ होता. हा चित्रपट १९८६ मध्ये आला होता. या चित्रपटात गोविंदाच्या अपोझिट नीलम, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, प्रेम चोप्रा आणि अनिता राज होते. हा चित्रपट पहलाज निहलानीने प्रोड्यूस केला होता आणि शिबू मित्राने दिग्दर्शित केला होता.

टॅग्स :गोविंदाशत्रुघ्न सिन्हा