Join us

‘सिरीयल किसर’ इमरान हाश्मीने का बंद केले किसिंग सीन, जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 12:10 PM

आजही त्याचा ‘सिरीयल किसर’ हा टॅग पूर्णपणे निघालेला नाही मात्र त्याने किसिंग सीन देणे पूर्णपणे बंद केले आहेत.

एका पाठोपाठ एक चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स देणारा आणि यामुळे बॉलिवूडमध्ये ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मीने २००३ साली ‘फुटपाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. इमराने जवळपास आपल्या प्रत्येक सिनेमात किसींग सीन दिला आहे. त्याचे चाहते देखील त्याच्या किसिंग सीनचे दिवाने आहेत. 

किसिंग सीन देणारा इमरान हाश्मी अचानक किसिंग सीन द्यायला टाळाटाळ करू लागला. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला की, इमरान हाश्मी आता सिरियल किसर राहिला नाही. यामागचे कारण समोर आले आहे. इमरान हाश्मीला असे वाटते की, किसिंग सीनची व्हॅल्यू कमी झाली आहे. काही वर्षांपूर्वी लोक या विरुद्ध बोलत होते. मात्र आता ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. तसेच चित्रपट कितीही चांगला असू दे पण हायलाइट फक्त किसिंग सीनच होतात, ही गोष्ट त्याला पटली नाही. 

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता. सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले. यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

या चित्रपटांव्यतिरिक्त जहर, आशिक बनाया आपने, चॉकलेट, कलयुग, गँगस्टर, अक्सर,  गुड बॉय बेड बॉय, आवारापन, द ट्रेन, राज, जन्नत, क्रूक, वन्स अपऑन अ टाइम इन मुंबई, मर्डर 2, जन्नत 2 आणि द डर्टी पिक्चर सारख्या चित्रपटात त्याने काम केले आहे.

याशिवाय इमरान हाश्मी शांघाई, एक थी डायन, घनचक्कर, उंगली, हमारी अधूरी कहानी, अजहर, बादशाहो, वेलकम टू न्यूयॉर्क, व्हाए, चीट इंडिया, मुंबई सागा आणि द बॉडी सारख्या चित्रपटात दिसला आहे. यात किसिंग सीन फारच कमी दिसले. त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर तो चेहरे, गंगुबाई काठियावाड आणि एजरा या चित्रपटात झळकणार आहे.

टॅग्स :इमरान हाश्मीचेहरे