Join us  

'वेलकम 3' मध्ये उदय भाई का नाही? नाना पाटेकर स्पष्टच म्हणाले- "दुसरा भाग फ्लॉप झाल्याने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 12:38 PM

'वेलकम 3'मध्ये उदय भाई आणि मजनू भाई ही गाजलेली जोडी का नसणार? नाना पाटकेरांनी केला खुलासा (nana patekar)

'वेलकम' आणि 'वेलकम २' या दोन्ही सिनेमांमध्ये नाना पाटेकर आणि अनिल कपूर ही जोडी प्रचंड गाजली. 'कंट्रोल उदय' असं म्हणत स्वतःवर ताबा मिळवणाऱ्या नाना पाटेकरांचा उदय सर्वांना आवडला. नाना पाटेकर आणि अनिल कपूर ही जोडी 'वेलकम 3'मध्ये नसणार आहे. यााविषयी बोलताना नाना पाटेकर यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला.

नाना पाटेकर 'वेलकम 3' बद्दल काय म्हणाले?

नाना पाटेकर यांना लल्लनटॉपच्या मुलाखतीत 'वेलकम 3' बद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी नानांनी सर्वांना सांगितलं की, "२०१५ मध्ये 'वेलकम बॅक' यशस्वी झाला नव्हता आणि त्यामुळेच मी आणि अनिल कपूर आम्ही दोघांनी अहमद खान दिग्दर्शित 'वेलकम 3' नाकारला. आमच्याकडे संपर्क करण्यात आला, पण आम्ही नकार दिला. वेलकम 3 मध्ये कथा नाही. स्टोरी वाचून इतकी मजा आली नाही."

'वेलकम 3' बद्दल थोडंसं..

'वेलकम 3' अर्थात 'वेलकम टू द जंगल' सिनेमा 27 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. फरहाद सामजी यांनी स्क्रिप्ट लिहिली असून या सिनेमात दिग्गज स्टार्सची फौज आहे. यात जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय कुमार, आफताब शिवदासानी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, मिका सिंग दलेर मेहंदी, राहुल देव, मुकेश तिवारी यांच्या भूमिका आहेत. याशिवाय यशपाल शर्मा, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी यांच्यासह अनेक स्टार्स आहेत.

टॅग्स :नाना पाटेकरअनिल कपूरबॉलिवूड