Join us

अपार्टमेंटमध्ये राहण्याची का वेळ आली सलमान खानवर, खुद्द सलीम खान यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 17:05 IST

बॉलिवूडचा दबंग खान सलमान मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो आहे. त्यामागचे कारण खुद्द त्याचे वडील सलीम खान यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देसलमानला बंगला घेणे खूप सोपे - सलीम खानमाझ्यामुळे सलमान बंगला घेत नाही - सलीम खान

बॉलिवूडचा दबंग खान सलमान मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो आहे. अमिताभ बच्चनचा जलसा बंगला, शाहरूख खानचा मन्नत बंगला हे प्रसिद्ध आहे. त्यात सलमान खानसारखा सुपरस्टार बंगला, व्हिला किंवा पेंटहाऊस सोडून अपार्टमेंट राहतो आहे. याबाबतचा खुलासा त्याचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत केला. 

सलीम खान यांनी सांगितले की, सलमानला बंगला घेणे खूप सोपे आहे. मात्र तो आमच्यासोबत वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. याचे कारण मी आहे. सलमानने कित्येक वेळा मला सांगितले की मी एक बंगला किंवा पेंटाहाऊस घेतो. पण इथे मी १९७३मध्ये राहायला आलो आणि इथून मला सोडून जाण्याचे मन नाही. मी कुठे जात नाही त्यामुळे सलमान पण आमच्यासोबतच राहतो आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही जर मोठ्या घरात गेलो तर सलमानसाठी खूप छान होईल. तो बिचारा एका अपार्टमेंटमध्ये कसाबसा राहतो आहे. अर्ध्या अपार्टमेंटमध्ये त्याने जिम बनवली आहे. अर्ध्यात त्याचे कपडे, चप्पला आणि स्वतः तो राहतो आहे. कसेही तो त्यात स्वतःला मॅनेज करतो आहे.

सलीम खान यांनी सुरूवातीच्या दिवसात खूप स्ट्रगल केला आहे. मात्र जंजीर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते गॅलेक्सीत राहायला आले. त्यांना तिथे चांगले वाटले. ते म्हणाले की खरे सांगू तर तेव्हा वाटले होते की हेच माझे शेवटचे ठिकाण असेल. तेव्हापासून मी इथेच राहतो आहे. 

इतकेच नाही तर सलीम खान यांनी सलमान खानशी संबधित अनेक किस्से सांगितले. त्यांनी सांगितले की, सलमानला हिट अॅण्ड रन प्रकरणी शिक्षा झाली होती. त्यावेळी मी तुरुंगात भेटायला गेलो होतो. तेव्हा आम्हाला पाहून त्याला पाहून खूप त्रास झाला होता. सलमानला आयुष्यात याच गोष्टीची खंत वाटते की त्याने आपल्या आई-वडिलांना खूप त्रास दिला आहे.

टॅग्स :सलीम खानसलमान खान