Shah Rukh Khan: 'किंगखान' शाहरूख खान जगभरातील करोडो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. जगभरात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. शाहरूखने पन्नाशी कधीच ओलांडलीये. पण आजही तरूणाई त्याच्यावर फिदा आहे. त्यातही त्याच्या फिमेल फॅन्सची संख्या मोठी आहे. रोमान्सच्या या बादशहावर तरूणी जीव ओवाळून टाकतात. आजही शाहरूख दिसला की त्याच्या फिमेल फॅन्स अक्षरश: वेड्या होतात. शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी, त्याला स्पर्श करण्यासाठी, त्याला मिठी मारण्यासाठी तुटून पडतात. हेच कारण आहे की आता शाहरूखने स्वत:साठी लेडी बॉडीगार्ड्स नेमल्या आहेत. या लेडी बॉडीगार्ड्स आता शाहरूखचं फिमेल फॅन्सपासून रक्षण करणार आहेत. अर्थात कारण फक्त इतकं नाही, शाहरूखने स्वत:साठी लेडी बॉडीगार्ड्स नेमण्यामागं आणखीही एक कारण आहे.
शाहरूख त्याच्या जेंटल बिहेविअरसाठी ओळखला जातो. ट्रूली जेंटलमन, अशी त्याची ओळख आहे. महिलांसोबत तो अतिशय आदराने वागतो. हेच कारण आहे की, त्याने लेडी बॉडीगार्ड्स नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मेल बॉडीगार्ड्स अनेकदा फिमेल फॅन्ससोबत उद्धटपणे वागतात. शाहरूखला हे नकोय. मेल बॉडीगार्ड्स माझ्या फीमेल फॅन्सना त्याच्यापासून लांब करण्यासाठी धक्का देतात, हे पाहून मला खूप वाईट वाटतं, असं शाहरूख एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला होता.
'' जेव्हा मी पब्लिक प्लेसमध्ये जातो,तेव्हा तिथे मुलींना माझ्याजवळ यायचं असतं माझ्यासोबत फोटो काढायचे असतात, माझ्यासोबत हात मिळवायचा असतो. पण त्या ज्या पद्धतीनं अंगावर येतात ते अनेकदा घाबरवणारं असतं. त्यामुळे मी लेडी बॉडीगार्ड्स नेमल्यात. मला प्रोटेक्ट करण्याच्या नादात माझे मेल बॉडीगार्ड्स मुलींना धक्का द्यायचे ते खूप उद्धटपणाचं वाटायचं मला. हे टाळण्यासाठी लेडी बॉडीगार्ड्स हा चांगला उपाय आहे, असं मला वाटतं'', असं तो म्हणाला.