बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिचे लाखो चाहते आहेत. पण आता सोशल मीडिया रवीनाच्या मुलीचाही फॅन झाला आहे. होय, रवीना टंडनची मुलगी फारशी लाईमलाईटमध्ये नसते. पण एका व्हिडीओमुळे ती अचानक चर्चेत आली.या व्हिडीओत रवीना तिच्या वयोवृद्ध आईवडिलांसोबत दिसतेय. तिच्यासोबत तिची लेकही आहे. रवीनाने वडिलांचा हात पकडला आहे आणि हळूहळू त्यांना सोबत घेत ती चालते आहे. रवीनाची लेक सगळ्यांच्या समोर आहे. पण अचानक आपल्या आजीला चालताना त्रास होतोय, हे ती बघते आणि तशीच मागे वळत आजीच्या मदतीसाठी जाते. आजीचा हात पकडून ती तिला गाडीपर्यंत घेऊन जाते.
अन्य युजर्सनेही अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुझी मुलगी खूप सुंदर आहे. सोबत जबाबदारही आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. खरे तर सोशल मीडिया फार क्वचित कुणाचे कौतुक करताना दिसतो. त्यामुळे सोशल मीडियावर रवीनाच्या लेकीचे कौतुक होत आहे म्हटल्यावर लगेच त्याची बातमी झाली.