Join us

विकी कौशलने याबाबतीत टाकले इतर अभिनेत्यांना मागे, बनला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 14:38 IST

विकीचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘भूत’च्यामूळे आणि कैटरीना कैफसोबत असलेल्या त्याच्या घनिष्ट मैत्रीमूळे व्हायरल न्यूजमध्ये तो सतत चर्चेत राहिलेला आहे. आणि ह्यामूळेच तो नंबर वन स्थानी पोहोचला.

नुकत्याच रिलीज झालेल्या भूत ह्या आपल्या भयपटानंतर बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता बनलेला आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या व्हायरल न्यूज श्रेणीत बाकी बॉलीवूड अभिनेत्यांना मागे टाकत विकी कौशल लोकप्रियतेत शिखरावर असलेला दिसून आलेला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

ह्या आकडेवारीनूसार, व्हायरल न्यूज सेक्शनमध्ये विकी कौशलने 100 गुणांसह लोकप्रियतेत प्रथम स्थान पटकावले आहे. विकीचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘भूत’च्यामूळे आणि कैटरीना कैफसोबत असलेल्या त्याच्या घनिष्ट मैत्रीमूळे व्हायरल न्यूजमध्ये तो सतत चर्चेत राहिलेला आहे. आणि ह्यामूळेच तो नंबर वन स्थानी पोहोचला.

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर 46 गुणांसह दूस-या स्थानी आहे. शाहिदचा त्याच्या चित्रपटाच्या सेटवर झालेला अपघात, त्यानंतर त्याने चित्रीकरण पून्हा सुरू करणे, आणि त्यानंतर त्याची पत्नी मीरासोबत शाहिदने साजरा केलेला वाढदिवस ह्या सगळ्या कारणांमूळे तो गेले काही दिवस सतत चर्चेत होता. आणि म्हणूनच तो बाकी बॉलीवूड स्टार्सना मागे टाकून दूस-या स्थानी पोहोचलेला आहे.

कार्तिक आर्यनची फिल्म ‘लव आज कल 2’बॉक्स ऑफिसवर जरी चांगली चालली नाही. तरीही त्याच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही आहे. आजही कार्तिक युवावर्गात खूप लोकप्रिय आहे. म्हणूनच तो 41 गुणांसह तिस-या स्थानी आहे.

टाइगर श्रॉफची फिल्म ‘बागी 3’ रिलीज़ झाल्यानंतर तो लोकप्रियतेची शिखरे पादाक्रांत करताना दिसतोय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आंकडेवारीनूसार, टाइगर 38 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. बॉक्स ऑफिसवर 280 कोटी पार केलेली फिल्म तान्हाजीमूळे सुपरस्टार अजय देवगन लोकप्रियतेत अजूनही दिसून येतोय. 36 गुणांसह अजय पांचव्या स्थानी आहे.  

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्विन कौल म्हणतात, "आम्ही मीडिया विश्लेषणासाठी 14 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशने आणि डिजिटल प्लेटफॉर्म समाविष्ट आहेत. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

टॅग्स :विकी कौशलभूत चित्रपट