Join us

​‘बेफिक्रे’रणवीर आता तरी घेईल का धडा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 3:03 PM

रणवीर सिंहच्या ‘बेबंद’ वागण्यावर अंकूश लावला गेलाय. होय, रणवीर म्हणजे बॉलिवूडचा बिनधास्त अ‍ॅक्टर. मनमौजी वागणारा, बेधडक बोलणारा. कुठलेही काम ...

रणवीर सिंहच्या ‘बेबंद’ वागण्यावर अंकूश लावला गेलाय. होय, रणवीर म्हणजे बॉलिवूडचा बिनधास्त अ‍ॅक्टर. मनमौजी वागणारा, बेधडक बोलणारा. कुठलेही काम करताना रणवीर घाबरत नाही. मग ती कंडोमची जाहिरात असो वा चित्रपटातील इंटिमेट सीन्स. खरे तर सेलिब्रिटी हे बिरूद मिरवताना अनेकदा आपल्या विचारांना, वागण्या-बोलण्याला लगाम घालावा लागतो. पण ही गोष्ट रणवीरला हे मान्य नाही. कदाचित याचमुळे तो वादात सापडला आहे. त्याच्या एका ‘बेबंद’ कृत्यावर लगाम लावण्यात आलायं.प्रकरण आहे, रणवीरच्या एका जाहिरातीबद्दलचे. सध्या या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर रणवीरवर टीकेची झोड उठतेयं. मेट्रो सिटीजमध्ये ठिकठिकाणी रणवीरच्या या जाहिरातीचे होर्डिंग्स लागले आहेत. यात रणवीर एका मिनी ड्रेस घातलेल्या मुलीला आपल्या खांद्यावर उचलून नेताना दिसतो आहे आणि त्याला ‘Take Your Work At Home’ अशी टॅग लाईन देण्यात आली आहे. सोशल मीडियावर सामान्य जनतेसोबतच ‘रंग दे बसंती’फेम अभिनेता सिद्धार्थ याने रणवीरच्या या जाहिरातीला तीव्र विरोध केला. याचा परिणाम म्हणजे, संबंधित कंपनीला रणवीरची ही जाहिरात मागे घ्यावी लागली. केवळ इतकेच नाही तर त्यासाठी माफीही मागावी लागली. या होर्डिंग जाहिरातीने लोकांच्या भावना दुखावण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता. तत्काळ प्रभावाने हे होर्डिंग्स हटवण्यात येत आहे, असे कंपनीने म्हटले आहे. निश्चितपणे रणवीरनेही या जाहिरातीवर खुलासा दिला आहे. लोकांना ही जाहिरात आवडली नाही. पण यामागे कुठलाही वाईट हेतू नव्हता, असे तो म्हणाला. एकंदर काय तर रणवीरने यातून धडा घ्यायला हवा. बिनधास्त अ‍ॅक्टर ही इमेज जपताना रणवीरने पब्लिक इमेजचाही विचार करायला हवा, इतकेच आम्ही म्हणू, बाकी काय?