29 जुलै हा दिवस परिणीतीसाठी खूपच खास आहे. कारण या दिवशी तिचे ढिश्शूम आणि बीएफजी हे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या दोन्ही चित्रपटात परिणीतीच्या महत्त्वाच्या भूमिका नाहीयेत. तरीही ते दोन्ही चित्रपट तिच्यासाठी खूपच खास असल्याचे ती सांगते. ढिश्शूम या चित्रपटात तिने एक डान्स नंबर केलेला आहे तर बीएफजी या चित्रपटासाठी तिने वॉईजओव्हर दिलेला आहे. याबाबत सीएनएक्ससोबत बोलताना परिणीती म्हणाली, ढिश्शूम आणि बीएफजी हे माझे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने मी खूपच खूश आहे. या दोन्ही चित्रपटांमधील माझा सहभाग हा अतिशय छोटासा आहे. पण तरीही या दोन्ही चित्रपटांत काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. ढिश्शूम या चित्रपटात एक मस्ती डान्स नंबरवर मी थिरकली आहे तर बीएफजी या चित्रपटात एका व्यक्तिरेखेसाठी मी माझा आवाज दिला आहे. माझ्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करावी अशी माझी इच्छा आहे.
29 जुलै परिणीतीसाठी लकी ठरेल का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 9:48 AM