प्रभासला घेऊन चित्रपट तयार करणार भूषण कुमार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 9:41 AM
बाहुबली फेम प्रभास सोबत काम करण्यास प्रत्येकजण उत्सुक आहेत. भूषण कुमार प्रभासला घेऊन चित्रपट तयार करत असल्याची चर्चा आहे. ...
बाहुबली फेम प्रभास सोबत काम करण्यास प्रत्येकजण उत्सुक आहेत. भूषण कुमार प्रभासला घेऊन चित्रपट तयार करत असल्याची चर्चा आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार भूषण कुमार यांची एक टीम तयार आहे जी साऊथच्या चित्रपटांशी संबंधीत काम पाहणार आहे. जी प्रभाससोबत अनेक साऊथच्या मोठ्या कलाकारांशी भेटीगाठी करते आहे. अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत चित्रपटांच्या डील फायनल करण्याच्या तयारीला लागली आहे. भूषण कुमारसह अनेत निर्मात्यांना साऊथ इंडस्ट्रिमध्ये आपला जागा तयार करायची आहे. आपल्या आगामी चित्रपट रेडच्या प्रमोशन दरम्यान नवभारत टाईम्स डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत भूषण यांनी सांगितले की, त्यांना तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये चित्रपट तयार करायचा आहे. सगळ्या चित्रपटांना हिंदीत डब करण्यात येणार आहे. जर सगळे आमच्या प्लॉनिंगनुसार झाले तर येत्या 20 दिवसात साऊथमधल्या एका स्टारसोबत आम्ही चित्रपटाची घोषणा करु. आमचा हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड आणि हिंदी भाषेत तयार करण्यात येईल. ज्यावेळी त्यांनी यात प्रभासला साइन केले आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी हसत भूषण कुमारने उत्तर दिले की, चित्रपटाचे नाव आणि त्यातील लीड कलाकारांबाबत जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. यावेळी मी फक्त तुम्हाला ऐवढेच सांगू शकतो की यात साऊथमधला मोठा चेहरा दिसणार आहे. भूषण कुमार यांचा ‘रेड’ चित्रपट 16 मार्चला रिलीज होणार आहे. यात अजय देवगण टॅक्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा लखनऊमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. यात इलियाना डिक्रूज आणि अजय देवगण यांच्या मुख्य भूमिका आहेत. अजय देवगणसोबत इलियानाची ‘बादशाहो’मध्ये चांगलीच केमिस्ट्री बघावयास मिळाली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी पडद्यावर बघावयास मिळणार असून, त्यास कशा पद्धतीने प्रेक्षक प्रतिसाद देतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.