मुंबई – सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतची चर्चा देशभरात आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर कंगनानं बॉलिवूडमधील घराणेशाहीवर आरोप केला, त्यानंतर अनेकांनी तिला पाठिंबा दिला. एका मागोमाग एक अशाप्रकारे कंगना राणौत बॉलिवूडवर आरोप करत गेली. ती इतक्यावरच नाही थांबली तर तिने थेट करण जोहरवर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेही नाव जोडले.
कंगना राणौत आणि शिवसेना वाद राज्यात पेटला होता. सुशांत सिंह प्रकरणावरुन मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कंगनानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबई पोलिसांची भीती वाटते असं विधान केलं. मात्र तिच्या याच विधानावरुन राज्यात शिवसेना आणि कंगना असं महाभारत रंगलं. जर मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर कंगनानं मुंबईत राहू नये असं संजय राऊत यांनी म्हटलं मात्र त्यावरच कंगनानं प्रत्युत्तर देत संजय राऊत मला मुंबई न येण्याची धमकी देत आहेत असा आरोप केला.
त्यानंतर कंगनानं मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं आव्हानच शिवसेनेला दिलं, इतकचं नाही तर कंगना राणौतनं मुंबईचा पीओके म्हणून उल्लेख केल्यानं तिच्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच आहे असा टोला संजय राऊतांनी कंगनाला राणौतला दिला. याच दरम्यान मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयात अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली. कंगना मुंबईला येण्याआधीच बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर हातोडा मारला. या संपूर्ण प्रकारानंतर कंगना राणौतनं उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आव्हान दिलं.
कंगना राणौतचा बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींमध्ये सहभागी होता, जी तिच्या वक्तव्यामुळे आणि खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेचा विषय राहिली आहे. २०२० मध्ये कंगना राणौत खूप काळ चर्चेत आहे. जून २०२० नंतर सुशांतच्या मृत्यूनंतर कंगना प्रत्येक माध्यमात चर्चेत आहे. कंगना आणि शिवसेना संघर्ष हा वादही त्यात आहे. शिवसेना, कंगना राणौत आणि संजय राऊत यांच्यातील संघर्ष मागील काही आठवडे पाहायला मिळाला होता. कंगना शिवसेनेवर थेट हल्ला करत असल्याने ती आगामी काळात राजकारणात एन्ट्री घेण्याची शक्यताही सगळ्यांना वाटते. कंगनाच्या आईनेही काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला.
गणेशा स्पीक्सनं कंगनाच्या राजकीय भवितव्यावर तिच्या जन्मपत्रिकेनुसार अंदाज वर्तवले आहेत. २०२० च्या भविष्यवाणीप्रमाणे येणारा काळ कंगनासाठी अनुकूल असेल. करिअरच्या १० व्या स्थानी गुरु असल्यामुळे कंगनाचा करिअरचा आलेख शुभ आहे. यामुळे कंगनाचा येणारा सिनेमा ‘थलाईवी’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो आणि याच सिनेमाच्या आधारे काही विशेष प्रोजेक्ट ती तिच्याकडे खेचून घेऊ शकते. त्यानंतर शनी आणि गुरु एकत्र येतील. जो कंगनासाठी चांगला काळ घेऊन येण्याची शक्यता आहे. मात्र नोव्हेंबरनंतर कंगनाशी निगडीत वाद वाढण्याची शक्यता आहे. यावर्षानंतर तिच्या खासगी आयुष्यात अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो. शनी स्वतःच्या राशिचक्रातून जात आहे, जे कदाचित कंगनाला कोणत्याही कायदेशीर समस्यांकडे खेचू शकते. एकूणच मिळून कंगनाची लोकप्रियता आणि चाहते हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. जयललिताच्या आयुष्यावर बनलेला ‘थलाईवी’ हा चित्रपट तिच्या कारकीर्दीसाठी चांगला ठरू शकेल.
कंगना आणि राजकारण
सतत माध्यमात चर्चेत राहणाऱ्या कंगनासाठी पंडितांना असा विश्वास वाटतो की, ती यापुढे चित्रपटांमध्ये ट्रेंड करणार नाही. ती सिंगल नायिका म्हणून आपली छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे आणि अशा कथांचा आता अभाव आहे. सध्या ती ज्यापद्धतीने बोलत आहे त्यावरुन ती आगामी काळात राजकारणात जाण्यासाठी उत्सुक आहे. तिची विचारसरणीही केंद्रातील भाजपाच्या सत्ताधारी पक्षाच्या जवळ आणते. तथापि, कंगनाच्या कुंडलीमध्ये अद्याप राजकारणात तिला विशेष महत्त्व नाही. संक्रमणातील शनी आपल्या तिसर्या दृष्टीने कुंडलीतील जन्माच्या सूर्याकडे पहात आहे, जे तिच्यासाठी विशेषतः चांगले नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Video: खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंचे मोठं विधान; सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा अन्...
“नेते जो आदेश देतील तो कार्यकर्ते पाळणार, राजकारणात कोणी मित्र नसतो किंवा दुश्मन नसतो”
...अन्यथा चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू; धनगर समाजाची आक्रमक भूमिका
फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक
‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू