Join us  

​संपणार का हृतिक-कंगणाचा ‘लव्ह अ‍ॅण्ड हेट एपिसोड’?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 1:01 PM

हृतिक रोशन आणि कंगना राणौत यांच्या कथित अफेअरवरून सुुरू झालेला वाद कोर्टापर्यंत गेला खरा. पण  ताज्या बातमीनुसार, कंगना वा ...

हृतिक रोशन आणि कंगना राणौत यांच्या कथित अफेअरवरून सुुरू झालेला वाद कोर्टापर्यंत गेला खरा. पण  ताज्या बातमीनुसार, कंगना वा हृतिक यांच्यातील वाद संपण्याच्या मार्गावर आहे. या प्रकरणाचा तपास करणा-या पोलिसांच्या मते, हृतिक कथितरित्या ज्या ई-मेलवरून कंगनाशी बोलायचा, तो ई-मेल आयडीचा आयपी अ‍ॅड्रेसचे लोकेशन अमेरिका आहे. अमेरिकेतूनच हा ई-मेल आयडी आॅपरेट होत होता. मीडियात प्रकाशित बातमीनुसार,  या ई-मेल आयडीचा खरा सूत्रधार कोण, हे शोधून काढण्यात क्राईम ब्रांचला अद्यापही यश आलेले नाही. कारण याचे सर्वर अमेरिकेत आहे. त्यामुळे हा ई-मेल आयडी कोण वापरत होता, याचा छडा लावणे पोलिसांसाठी कठीण झाले आहे.  तूर्तास तरी कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही आणि निघेल,याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे आहे त्या पुराव्यांच्या आधारावर एका निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.हृतिकने मला अनेक ईमेल पाठवले होते, असा कंगनाचा दावा आहे.  हृतिक मात्र हे मानायला तयार नाही. माझ्या नावाने कंगनाशी बोलणारा दुसराच कुणी बहुरूप्या असल्याचे त्याचे म्हणणे आहे.  याचा छडा लावण्यासाठी हृतिकने मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेची मदत घेण्याचा निर्णय घेत  १२ डिसेंबर २०१४ रोजी तक्रार दाखल केली होती. कुणीतरी अज्ञात व्यक्ति ह्यएचरोशनएटईमेलडॉटकॉमह्ण या ईमेल आयडीचा वापर करून माझ्या प्रशंसकांशी बोलत असल्याचे त्याने तक्रारीत म्हटले होते. ५ मार्च २०१६ रोजी हृतिकने पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला या प्रकरणाचा छडा लावण्याची विनंती केली आहे.काय आहे प्रकरण?एका मुलाखतीत कंगनाने हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले होते. यानंतर  हृतिकने कंगनाला अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली होती. कंगनानेही या नोटीसला उत्तर देत हृतिकला २१ पानांची नोटीस बजावली आहे. यानंतर दोघेही एकमेकांवर बेछूट आरोप करत सुटले होते.हृतिकचे आरोप1. कंगनाने मला १४३९ ईमेल पाठवले होते. यापैकी बºयाच ईमेलकडे मी दुर्लक्ष केले. हे सर्व ईमेल व्यक्तिगत, अभद्र भाषेत लिहिलेले होते.२. कंगना ही अ२स्री१ॅी१'२ २८ल्ल१िङ्मेी ने ग्रासलेली आहे. यामुळे ती कल्पनेत जगते. कल्पना रंगवते.कंगनाचे आरोप हृतिकनेच माझ्याशी बोलण्यासाठी खास ईमेल आयडी तयार केला होता. हृतिक  व सुजानचे नाते, त्यांच्यातील घटस्फोट याबाबत हृतिकने अनेकदा माझ्याशी वेगवेगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या. मी दिवसाना ५० ईमेल पाठवायची,असा हृतिक दावा करतो. असे असेल तर एकूण ६०१ दिवसांत माझ्याकडून हृतिकला ३० हजार ईमेल मिळायला हवेत. पण हृतिकने माझ्याकडून १४३९ ईमेल मिळाल्याचा दावा केला आहे. यावरूनच त्याचे दावे किती खोटे आहेत, हे कळते.2. मी नाही तर हृतिक स्वत: मानसिक रूग्ण आहे.