सुनील शेट्टी हे बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध अभिनेते. केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथ इंडस्ट्रीतही सुनील यांच्या अभिनयाचा चांगलाच दबदबा आहे. सुनील शेट्टी म्हणजेच बॉलिवूडचे अण्णा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे सुनील लवकरच आजोबा होणार असल्याची चर्चा आहे. सुनील यांनी कॉमेडियन भारती सिंगसोबत केलेल्या वक्तव्याने या चर्चेला उधाण आलंय. बघूया काय म्हणाले सुनीलअण्णा.
सुनील सध्या 'डान्स दिवाने'च्या मंचावर माधुरी दीक्षितसोबत या शोचं परीक्षण करत आहेत. या शोचं सुत्रसंचालन करत आहे कॉमेडियन भारती सिंग. या शोच्या एका एपिसोडमध्ये भारती सुनील यांना विचारते, "तुम्हाला आजोबा झाल्यावर कसं वाटेल? कारण कोणताही मुलगा तुमच्यासारखे कूल आजोबा बघून आश्चर्यचकीत होईल." यावर सुनील यांनी उत्तर दिलं की, "खरंय तुझं. जेव्हा या शोचा पुढचा सीझन येईल तेव्हा मी आजोबासारखं वागेल."
सुनील शेट्टींच्या या विधानाने लोकांचं लक्ष वेधून घेतलंय. याशिवाय सुनील यांची मुलगी अथिया शेट्टी गरोदर आहे का? अशीही चर्चा सुरु झालीय. केएल राहुल आणि अथिया हे त्यांचं वैयक्तिक आयुष्य जाहीररित्या कधीही दाखवत नाहीत. याशिवाय अथिया काही काळापासून चित्रपटात अभिनय करत नाही. इतकंच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून अथिया कोणत्याही पार्टी आणि इव्हेंटमध्ये दिसत नाहीय. त्यामुळे सुनील यांनी केलेल्या विधानामुळे अथिया खरंच गरोदर आहे का? असा सर्वांना प्रश्न पडलाय.