खरंच तमन्ना भाटिया पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत लग्न करणार काय? वाचा त्यातील सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 2:00 PM
‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या भलत्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, वृत्तानुसार तमन्नाचे पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूसोबत अफेअर ...
‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या भलत्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, वृत्तानुसार तमन्नाचे पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूसोबत अफेअर सुरू आहे. ऐवढेच नव्हे तर लवकरच ते दोघे विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. या बातमीवर शिक्कामोर्तब लावण्यासाठी दोघांचा एका ज्वेलरी शॉपमध्ये शॉपिंग करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. तमन्ना ज्या माजी पाक क्रिकेटपटूसोबत लग्न करणार आहे, त्याचे नाव अब्दुल रज्जाक आहे. सध्या या दोघांचा शॉपिंग करतानाचा फोटोही वाºयासारखा व्हायरल होत आहेत. जेव्हा या दोघांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर पसरविण्यात आली, तेव्हा अनेकांनी तमन्नाच्या या निर्णयाबद्दल नाराजीही व्यक्त केली. काहींनी तर तमन्नावर टीका करणाºया कॉमेण्ट शेअर केल्या. परंतु आम्ही तमन्ना आणि अब्दुल रज्जाकच्या लग्नाच्या बातमीचे सत्य सांगणार आहोत. जर तुम्हाला तमन्नाच्या या निर्णयाचा संताप होत असेल तर ही बातमी तुम्ही वाचायलाच हवी. कारण तमन्ना भाटिया आणि अब्दुल रज्जाक हे दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार नाहीत तर ही निव्वळ अफवा आहे. वास्तविक ज्या फोटोचा दाखला देऊन तमन्नाच्या लग्नाबद्दल अफवा पसरविल्या जात आहेत, तो फोटो २०१३ मधील आहे. जेव्हा तमन्ना दुबई येथील एका ज्वेलरी स्टोअरच्या ओपनिंगसाठी गेली होती, तेव्हा अब्दुल रज्जाकही त्याठिकाणी होता. त्यावेळी दोघेही एकत्र आले होते. त्यांनी स्टोअरमधील दागिने न्याहळूनही बघितले. वास्तविक त्यांनी या स्टोअरमधून कुठल्याही प्रकारची शॉपिंग केली नव्हती. त्यामुळे तमन्ना आणि रज्जाकच्या लग्नाच्या बातमीत कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. ही केवळ अफवा आहे. हाच तो फोटो ज्यामुळे तमन्ना आणि अब्दुल रज्जाकच्या लग्नाच्या अफवा पसरविल्या जात आहेत.खरं तर सोशल मीडियावर हे वृत्त चुकीच्या पद्धतीने पसरविण्यात आले आहे. तमन्ना आणि अब्दुल रज्जाक यांच्यात गेल्या कित्येक वर्षांपासून कुठल्याही प्रकारचा संवाद नाही. विशेष म्हणजे अब्दुल रज्जाक हा अगोदरच विवाहित असल्याने तमन्नासोबत लग्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे तमन्नाच्या चाहत्यांनी कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचण्याअगोदर ही बातमी वाचायलाच हवी. शिवाय आता या अफवेबाबत या दोघांकडून काय वक्तव्य केले जाते, हेही बघणे तेवढेच मजेशीर ठरणार आहे.