Join us

तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी

By तेजल गावडे | Published: October 17, 2020 1:24 PM

स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया चर्चेत आली आहे.

स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. बॉलिवूडमधील लव्हबर्ड्स तारा सुतारिया आणि आदर जैन लवकरच लग्न करणार असल्याचे समजते आहे. त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दलचा खुलासा इंस्टाग्रामवर केला होता. आता त्यांच्या लग्नाच्या चर्चेनंतर चाहत्यांचे त्यांच्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

स्पॉटबॉयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर जैन लवकरच गर्लफ्रेंड तारा सुतारियासोबत सात फेरे घेणार आहे. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप सीरियस आहेत आणि ते लवकरच लग्नबेडीत अडकण्याची शक्यता आहे. 

कपूर कुटुंबात रणबीर कपूर आणि आलिया भटच्या लग्नाची चर्चा होती. पण आता असं समजतंय की रणबीरच्या आधी त्याचा कजिन आदर विवाह बंधनात अडकणार आहे.

सूत्रांनी याबद्दल माहिती दिली की, आता काही कारणास्तव रणबीर-आलिया लग्नासाठी तयार नाहीत. तर रणबीरचा कजिन आदर कुटुंबातील एक आहे. त्याला तारासोबत लवकर लग्न करायचे आहे. आदरचा मोठा भाऊ अरमान जैनने मागील वर्षीच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केले होते. आदरचे करियर अद्याप सुरू झाले नाही आहे. तर ताराने २०१९ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आताच तिने तिच्या करिअरला सुरूवात केली आहे. मात्र त्यांच्या लग्नासाठी काहीही अडचण नाही.

तारा सुतारियाने हल्लीच आदर जैनच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या रिलेशनशीपबद्दल इंस्टाग्रामवर सांगितले होते. आदरदेखील ताराच्या पोस्ट्सवर आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेमाची हिंट देताना दिसतो.

आदरचा भाऊ अरमानच्या लग्नात तारा आणि आदर एकत्र पहायला मिळाले. याशिवाय बऱ्याचदा दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. आता ते दोघे लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :तारा सुतारियारणबीर कपूरआलिया भट