Join us  

‘राख’नंतर वाढणार का वीरदासकडे खलनायकी आॅफर्सचा ओघ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 6:05 PM

 विनोदी भूमिका करणाऱ्या  कलाकाराला गंभीर भूमिका करणं कठीण जातं. असंच काहीसं वीर दासच्या बाबतीत झालंय. त्याने आत्तापर्यंत अनेक कॉमेडी ...

 विनोदी भूमिका करणाऱ्या  कलाकाराला गंभीर भूमिका करणं कठीण जातं. असंच काहीसं वीर दासच्या बाबतीत झालंय. त्याने आत्तापर्यंत अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या.  पण आता तो गंभीर भूमिकांकडे वळू लागलायं. चित्रपट हिट होवो किंवा फ्लॉप तो प्रामाणिकपणे भूमिका वठवतो. ‘३१ आॅक्टोबर’मधील त्याचा अभिनय आणि शॉर्ट फिल्म ‘राख’मधील त्याची खलनायकाची भूमिका म्हणूनच दाद मिळवून गेली. भविष्यातही अशाच वेगळ्या धाटणीच्या भूमिका त्याला करायच्या आहेत.याबद्दल वीर दास म्हणातो, ‘मला प्रयोग करायला प्रचंड आवडतं. कलाकारानी कधीही एकाच धाटणीच्या भूमिकांमध्ये अडकू नये. त्यामुळेच मी कॉमेडी भूमिकांमध्ये अडक लो नाही. विनोदीनंतर गंभीर भूमिकाही स्विकारून पाहिल्या अन् त्या चाहत्यांना आवडल्या. त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं. कॉमेडी हा माझा कम्फर्ट झोन होता. त्यातून मी बाहेर पडलो आणि आता मी काहीतरी नवीन करतोय, याचं समाधान आहे. ‘३१ आॅक्टोबर’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. पण, चाहत्यांनी माझ्या भूमिकेची प्रशंसा केली. हीच मला मिळालेली मोठी पावती आहे.’