Join us

'मला किस करशील का?', चाहत्याच्या प्रश्नावर जान्हवी कपूरने दिले भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 8:57 PM

जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी नुकतेच प्रश्नोत्तरांचे सेशन ठेवले होते.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकताच तिचा रूही हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनय आणि डान्सची खूप प्रशंसा झाली. दरम्यान जान्हवीने नुकतेच सोशल मीडियावर एका सेशनमध्ये चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका चाहत्याने तिच्याकडे किस करण्याची मागणी केली. त्यावर जान्हवीने त्याला अजब उत्तर देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी नुकतेच प्रश्नोत्तरांचे सेशन ठेवले होते. त्यावेळी तिला अनेक चाहत्यांनी तिचे आगामी चित्रपट आणि तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले आणि जान्हवीनेही या प्रश्नांची उत्तरेही दिली. पण यातील एका चाहत्याने मात्र जान्हवीकडे विचित्र मागणी केली. त्याने लिहिले की, 'आपण किस करू शकतो का?' आणि चाहत्याच्या या प्रश्नाला जान्हवीने मजेशीर अंदाजात उत्तर सुद्धा दिले.

तिने चाहत्याच्या या मागणीच्या प्रश्नाचे उत्तर देताना स्वतःचा मास्कवाला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोसोबत जान्हवीनं 'नो' अर्थात नाही असे लिहिले. जान्हवीचा हा हटके अंदाज सर्वांनाच भावला आहे. तिच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर तिचे कौतुक होताना दिसत आहे. सोबतच अशी विचित्र मागणी करणाऱ्या चाहत्याची खिल्ली उडवली जात आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले जान्हवी कपूरने नुकतेच 'गुड लक जेरी'चे पहिले शेड्युल पूर्ण केले आहे. हा साऊथ स्टार नयनतारा अभिनित तमिळ चित्रपटाचा कोलामावू कोकिलाचा रिमेक आहे.

टॅग्स :जान्हवी कपूर