Join us

"वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है क्युंकी...", श्रद्धा कपूरची वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 15:25 IST

Shakti Kapoor And Shraddha Kapoor : आज शक्ती कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची लाडकी लेक श्रद्धा कपूर हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शक्ती कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असे एक अभिनेते आहेत ज्यांनी ॲक्शन ते कॉमेडी पर्यंत सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत आणि अनेक जबरदस्त पात्र भूमिका देखील केल्या आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची लाडकी लेक श्रद्धा कपूर हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रद्धा कपूरनेशक्ती कपूर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, आज मेरे पसंदीदा पुरूष का जनम दिन है. हॅप्पी बर्थडे बापू. वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है क्युंकी  उसके पापा का हात हर दम उसके सर पर है. लव्ह यू बापू. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

शक्ती कपूर हे बॉलिवूड अभिनेते आहेत ज्यांनी आतापर्यंत सुमारे ७०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. कादर खान यांच्यासोबत त्यांची जोडी अप्रतिम होती आणि असे म्हटले जाते की दोघेही जवळपास १०० चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. शक्ती कपूर हे दिल्लीचे रहिवासी असून त्यांचे वडील कॅनॉट प्लेसमध्ये टेलरचे दुकान चालवायचे. प्रदीर्घ संघर्षानंतर सुनील दत्त यांनी संजय दत्तचा पहिला चित्रपट 'रॉकी'मध्ये शक्ती कपूर यांना काम दिले. ही संधी त्यांच्यासाठी आयुष्य बदलणारी ठरली. शक्ती कपूर यांचे नाव सुनील सिकंदरलाल कपूर आहे. पण चित्रपटात त्यांची खलनायकाची भूमिका असल्याने सुनील दत्त यांनी त्यांचे नाव शक्ती कपूर ठेवले.

टॅग्स :श्रद्धा कपूरशक्ती कपूर