Join us

 गणेश आचार्य विरोधात नृत्यदिग्दर्शिकेची तक्रार; अश्लील व्हिडिओ बघण्यास बळजबरी केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 10:13 AM

बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यविरोधात एका 33 वर्षीय नृत्यदिग्दर्शिकेने अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनीही गणेश आचार्यवर गंभीर आरोप केले होते.

 बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सना आपल्या तालावर नाचवणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यविरोधात एका 33 वर्षीय नृत्यदिग्दर्शिकेने अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गणेश आचार्य कमिशनची मागणी करत अश्लिल व्हिडीओ पाहण्यासाठी बळजबरी करत असल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार,  इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचे महासचिव असलेल्या गणेश आचार्यवर संबंधित महिलेने अनेक आरोप केले आहेत.

पीडितेच्या तक्रारीनुसार, गणेश आचार्य इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचा महासचिव बनल्यापासून तिचा मानसिक छळ करत होता. तिने विरोध केल्यावर गणेशने तिचे सदस्यत्व रद्द केले, ज्यामुळे तिचे उत्पन्न बंद झाले. ती दुस-या नृत्य दिग्दर्शकाकडे काम मागण्यास जायची तेव्हा तिला आधी गणेश आचार्य सोबतची भांडणे मिटव आणि मगच आमच्याकडे ये असे तिला सगळे सांगायचे.  26 जानेवारीला माझे सदस्यत्व का रद्द केले? असा जाब विचारला असता गणेश आचार्य संतापला आणि त्याने त्याच्या सोबतच्या कोरिओग्राफर्सला सांगून पीडितेला बाहेर हाकलण्यास सांगितले. त्याच्या सांगण्यावरून दोन महिला कोरिओग्राफर्सनी पीडितेला मारहाण केली. पीडिता गणेशच्या आॅफिसात जायची तेव्हा तो तिला अश्लिल व्हिडीओ पाहण्यास बळजबरी करायचा.काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनीही गणेश आचार्यवर गंभीर आरोप केले होते. गणेश आपले वजन वापरून नव्या डान्सर्सला गंडवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

टॅग्स :गणेश आचार्य