Join us

"स्त्रियांना अजूनही मिळत नाही समान संधी"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2017 11:43 AM

महिला उद्योजकांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता यात अभिनेत्री गुल पनागने हजेरी लावली होती. यावेळी ती महिला उद्योजकांना दिल्या ...

महिला उद्योजकांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता यात अभिनेत्री गुल पनागने हजेरी लावली होती. यावेळी ती महिला उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीबाबत बोलत होती. आपण राहतो त्या समाजात पुरुषांना १०० टक्के आरक्षण आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांना समान वेतन व समान संधी हे आपले मार्गदर्शक तत्त्व आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यापेक्षा जास्त लक्ष आपण लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये याकडे देतो. शीरोजद्वारे महिला व्यायवसायिकांसाठीचा भारतातील सर्वात मोठा फोरम 'एमआईए शीरोज संमेलन २०१७'मध्ये महिला उद्योजकांसाठीच्या भविष्यातील संधी याविषयावर अभिनेत्री गुल पनाग बोलत होती. ती पुढे म्हणाली आपल्याकडे अधिक मोठ्या आणि गंभीर समस्या आहेत आणि त्या वेळीच ओळखून परिस्थितीत बदल करणे आवश्यक आहे. अर्थात हा बदल आपोआप घडणार नाही. हा बदल आपण निवडून दिलेल्या सरकारांच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवून देण्यात सरकारची ही महत्त्वाची भूमिका आहे.  सर्व व्यावसायिक स्तरांवरील महिलांना करिअर स्थळांची माहिती प्रदान करणारा ऑनलाइन मंच शीरोजद्वारे 'एमआईए शीरोज संमेलन २०१७'चे आयोजन करण्यात आले. संमेलनाच्या पाचव्या पर्वाची थीम 'फ्युचर ऑफ वर्क अशी होती आणि यावेळी महत्वाकांक्षी महिलांसाठीच्या‍ संभाव्य आणि पर्यायी संधींवर चर्चा करण्यात आली.