रवींद्र मोरे
८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस आहे. संपूर्ण जगात हा दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. बॉलिवूडसाठी मागचे वर्ष विशेष राहिले. ब-याच नव्या चेह-यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि प्रेक्षकांनीही त्यांना खूप पसंत केले. आज आपण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया ज्यांनी गेल्या वर्षी दमदार डेब्यू केला आणि तो यशस्वी ठरला.
* जान्हवी कपूर
श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवीचा डेब्यू सर्वात जास्त चर्चेत राहिला. जान्हवीने ‘धडक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच श्रीदेवीचे निधन झाले होते. अशातच चित्रपटाच्या प्रमोशनपासून ते रिलीज पर्यंत बºयाच प्रसंगी जान्हवी इमोशनल दिसली. या चित्रपटात जान्हवी सोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर मुख्य भूमिकेत होता. क्रिटिक्स आणि प्रेक्षकांनी या चित्रपटास संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. या चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन ७० कोटी होते.
* सारा अली खान
जान्हवीची तुलना ज्या अभिनेत्रीसोबत केली जात आहे, ती आहे सारा अली खान. सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी साराने ‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारा डेब्यू केला होता. साराची फक्त स्क्रीनवरच नव्हे तर चित्रपट प्रमोशनदरम्यान साराची स्क्रीन प्रेजेंसची सुद्धा खूप प्रशंसा झाली होती. पहिल्याच चित्रपटात साराने अभिनयाद्वारे खूपच वाहवा मिळवली. ६० कोटी बजेटच्या या चित्रपटाने सुमारे ९६ कोटी पेक्षा जास्त कमाई केली होती.
* बनिता संधू
शूजित सरकारने २०१८ मध्ये ‘अक्टूबर’ चित्रपटाद्वारा बनिता संधूला बॉलिवूडमध्ये आणले होते. या चित्रपटात बनिता सोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत होता. बनिताने या चित्रपटात अशी भूमिका साकारली होती, जी कोमात जाते. तिच्या या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले होते. चित्रपटात येण्याअगोदर बनिताने बºयाच जाहिरांतीमध्ये काम केले आहे.
* मौनी रॉय
टीव्ही जगतात नावलौकिक मिळवल्यानंतर मौनी रॉयने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मौनीने अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ चित्रपटाद्वारा डेब्यू केला आहे. या चित्रपटात मौनीने एक पारंपरिक बंगाली महिलेची भूमिका साकारली होती. स्वातंत्र्य दिनानिमित्त रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर सरासरी बिझनेस केला होता.
* मिथिला पालकर
वेबसिरीजच्या माध्यमातून मिथिला पालकरने प्रेक्षकांदरम्यान आपली ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये ‘कारवां’ चित्रपटाद्वारा डेब्यू केला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत इरफान खान आणि दलकीर सलमान मुख्य भूमिकेत आहेत. लहान बजेटच्या या चित्रपटास क्रिटिक्सने चांगले रिव्यूज दिले होते.