भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. जगाच्या कानाकोप-यात आज सनीचे मोठ्या संख्येत फॉलोअर्स आहेत. तिची एक झलक पाहता यावी यासाठी चाहते उत्सुक असतात. इतकी लोकप्रियता, चाहत्यांचे प्रेम मिळवणं सनी लिओनीसाठी सोपं नव्हतं. त्यासाठी तिला प्रचंड मेहनत करावी लागली. त्याचमुळे इंडस्ट्रीत आज ती स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करु शकली. सनीलाही इतरांप्रमाणे संघर्ष करावा लागलाय. नेहमीच मनात दाटून आलेल्या भावनांना वाट मोकळी करुन देताना सनी दिसते. महिला दिनानिमित्त सनीला तिचा संघर्षाचा काळ आठवलाय.
सोशल मीडियावर सनीने चाहत्यांसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने म्हटले की, जेव्हा ती २१ वर्षाची होती. तेव्हा तिच्यावर लोकं नेहमीच संताप करायचे. तिचा तिरस्कार करायचे. तिला काम मिळणे बंद झाले होते. कोणीही पंसत करत नसल्यामुळे इंडस्ट्रीतून तिला बॉयकॉट केले गेले होते. माझ्या प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवली गेली.इंडस्ट्रीतून कधीच ना काम मिळाले ना सपोर्ट मिळाला. मात्र हार न मानता, खंबीरपणे काम करत राहिली. सुरुवातीला लोकांनी नाकारले, काम देणे बंद केले. पण आज मोठ्या मेहनीने सा-यांची पसंती मिळवली आहे. आज मी माझी ड्रिम लाइफ जगत आहे.
माझ्यासोबत ज्यांना काम करायचं त्यांच्यासोबत मला काम करायचं, इतकं सोपं आहे. मी यावर जास्त विचार करत नाही. मी खूप रिअॅलिस्टिक आहे. जे माझ्या ताटात वाढलं आहे ते खायला आवडतं. तसंच माझ्यासोबत ज्यांना काम करायचं त्यांच्यासोबत मला काम करायला आवडेल. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगलं माणूस बनावं.
त्यांना पैशांची किंमत असावी आणि मेहनत करावी हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. सनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून चाहत्यांचीही प्रचंड पसंती मिळत आहे. व्हिडीओ पाहून चाहतेही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.