Women's March: डोनाल्ड ट्रम्पविरोधात एकवटल्या प्रियांका चोप्रा आणि नर्गीस फाखरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2017 08:31 AM2017-01-22T08:31:14+5:302017-01-22T14:01:14+5:30

प्रियांका चोप्रा, नर्गीस फाखरी आणि सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ सिनेमातील को-स्टार चीनी अभिनेत्री झू झू यांनी अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निघालेल्या महिला मोर्चाला सोशल मीडियावर समर्थन दिले आहे.

Women's March: Priyanka Chopra and Nargis Fakhri, co-starring Donald Trump | Women's March: डोनाल्ड ट्रम्पविरोधात एकवटल्या प्रियांका चोप्रा आणि नर्गीस फाखरी

Women's March: डोनाल्ड ट्रम्पविरोधात एकवटल्या प्रियांका चोप्रा आणि नर्गीस फाखरी

googlenewsNext
ेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. राष्ट्राध्यक्ष पदाची शुक्रवारी त्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात जगभरातील महिला एकवटल्या असून शनिवारी लाखो महिलांनी रस्त्यावर उतरून अभूतपूर्व असे आंदोलन केले.

या आंदोलनाच्या समर्थनार्थ बॉलीवूड डिवा प्रियांका चोप्रा, नर्गीस फाखरी आणि सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ सिनेमातून हिंदीमध्ये पदार्पण करणारी चीनी अभिनेत्री झू झू यांनी सोशल मीडियावर आपापले संदेश शेअर केले आहेत. प्रियांकाने ट्विट करून मोर्चामध्ये सहभागी होऊ न शकल्याची खंत व्यक्त करीत लिहिले की, ‘या महिला मोर्चामध्ये उतरलेल्या माझ्या सर्व भगिनी व पुरुषांचा मला खूप अभिमान वाटतो. मी येऊ न शकल्यामुळे खूप दु:ख होतेय.’

 
अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये शपथ घेतली. यावेळी शहरात अनेक ठिकाणी हिंसक प्रदर्शने करण्यात आली. ट्रम्प यांच्या निवडीमुळे अमिरिकेतील उदारमतवादी धोरणांचा अंत होणार असून अल्पसंख्यांक, अश्वेत आणि निर्वासित/स्थलांतरितांवर अत्याचार वाढणार असल्याचे ट्रम्प विरोधकांचे म्हणने आहे.

ALSO READ: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात हे बॉलिवूड सेलेब्स लावणार तडका

ट्रम्प यांचे महिलांविषयी मत फार संकुचित असून स्त्री म्हणजे केवळ उपभोगाची वस्तू असल्यामुळे त्यांचा विरोध म्हणून गुलाबी रंगाच्या टोप्या घालून महिला रस्त्यावर उतरल्या. संपूर्ण जगभर सोशल मीडियावर या ‘वुमेन मार्च’ला समर्थन देण्यात आले. नर्गीस फाखरी आणि झू झूने मोर्चाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून समर्थन दर्शविले.

 


यावेळी ‘महिलांना समान अधिकार हवेत’, ‘महिलाशक्ती एकत्र आली आहे’, ‘महिला जग बदलण्यास सक्षम आहेत’ अशा आशयाचे संदेश-फलक जागोजागी दिसत होते. केवळ ट्रम्प प्रशासन नाही तर संपूर्ण व्यवस्थेला आम्ही सूचित करू इच्छितो की, संपूर्ण महिला आता एकवटल्या असून आम्हाला कमी समजण्याची चूक करू नका, असे आयोजकांनी म्हटले.

READ MORE:
ट्रम्प यांच्या विरोधात केटी पेरी उतरणार रस्त्यावर​
​ट्रम्पच्या अमेरिकेत मायली सायरस करणार नाही लग्न!

Web Title: Women's March: Priyanka Chopra and Nargis Fakhri, co-starring Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.