Join us

​कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये फरहान अख्तरला काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 9:41 AM

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येत असल्याचे आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले आहे. कपिल ...

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येत असल्याचे आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले आहे. कपिल देव यांची भूमिका चित्रपटात साकारण्यासाठी कोणकोणत्या अभिनेत्यांची नाव चर्चेत असल्याची ही आम्ही तुम्हाला सांगितले आहे. कपिल देव यांची भूमिका साकारण्याची इच्छा एक बॉलिवूड अभिनेत्यांने व्यक्त केली आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून फरहान अख्तर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फराहनने कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फरहान हा कपिल देव यांचा मोठा फॅन आहे.ALSO READ : कपिल देव यांची भूमिका साकारणार रणवीर सिंग?काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती फरहानला माजी क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांची भूमिका साकाराची होती. मात्र त्यांने या गोष्टीचे खंडन केले आहे. याआधी संजय पूरण सिंग चौहान 1983 च्या विश्वकपवर आधारित चित्रपटात तयार करणार होते. त्यांनी या चित्रपटाची पटकथासुद्धा लिहिली होती. मात्र नंतर तो त्याचा आगामी चित्रपट चंदा मामा दूर के मध्ये व्यस्त झाला. कपिल देव यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे तर याची निर्मिती फैंटम करणार आहे. कबीर खान 1983 च्या वर्ल्डकपची स्टोरी ऐकून प्रभावित झाले आहेत. या चित्रपटाची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र या भूमिकेसाठी अर्जुन कपूर आणि रणबीर कपूर यांच्या नावाची चर्चा आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने फायनलमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला होता.