नवाजुद्दीन सिद्दीकीचा चित्रपट जोगीरा सारा रा रा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन प्रसिद्ध लेखक गालिब असद भोपाली यांनी केले आहे. हा चित्रपट कॉमेडीसोबतच रोमान्सनं परिपूर्ण असा आहे आणि या चित्रपटाचा आस्वाद तुम्ही कुटुंबासोबत घेऊ शकता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुशन नंदी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने गालिब असद भोपाली यांनी नवाजुद्दीनचे कौतुक केले आहे.
गालिब असद भोपाली नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल म्हणाले की, नवाजुद्दीन सिद्दीकीला विनोदाची चांगली जाण आहे आणि त्याला या शैलीमध्ये यापूर्वी पाहिलेले नाही. आम्ही बाबूमोशाय बंदूकबाजमध्ये एकत्र काम केले. हा एक डार्क सिनेमा होता. या चित्रपटाच्यावेळी नवाजच्या सेन्स ऑफ ह्युमर पाहिला होता. त्यामुळे जेव्हा आम्ही जोगिरा सारा रा रा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही चित्रपटाची योजना आखताना नवाजचा विचार केला.
अभिनेत्याला अजिबात इगो नाही...ते पुढे म्हणाले की, सेटवर अभिनेता खूप सहज वावरायचा पण थोडा रिझर्व्हही असतो. मात्र त्याला अजिबात टॅण्टरम किंवा इगो नाही. प्रत्येकाने आदर करावा, असे त्याला वाटते. असंवेदनशीलता त्याला आवडत नाही. कामाच्या बाबतीत त्याला परफेक्ट राहणे आवडते. तसेच तो इतर कलाकारांबद्दलही विचारतो. इतर कलाकार फक्त स्वतःवर लक्ष केंंद्रीत करतात. मात्र नवाजचे संपूर्ण कामावर बारकाईने लक्ष असते. त्याच्यासाठी प्रत्येक कलाकार आणि सीन महत्त्वाचा असतो.