बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar ) ‘खिलाडीयों का खिलाडी’ हा सिनेमा आठवत असेल तर त्यातली एक फाईटही आठवत असणारच. डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन रेसलर ‘द अंडरटेकर’ (WWE wrestler Undertaker ) याच्यासोबतचा या सिनेमातील अक्षयचा फाईट सीन्स चांगलाच गाजला होता. सिनेमात अक्षयने चक्क अंडरटेकरला हरवल्याचं दाखवण्यात आलं होतं. अर्थात सिनेमात अंडरटेकर नव्हताच. तर अंडरटेकरच्या भूमिकेत रेसलर ब्रायन ली होता. पण आता अंडरटेकर अक्षयसोबत रिअल मॅच करण्यास एकदम सज्ज आहे. होय, अक्षयच्या एका मजेदार मीमला उत्तर देत, अंडरटेकरने अक्कीला मॅचसाठी मी तयार असल्याचं म्हटलं आहे. (WWE wrestler Undertaker responds to Akshay Kumar)
‘खिलाडीयों का खिलाडी’ या सिनेमाला अलीकडे 25 वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्ताने अलीकडे अक्षयने एक मजेदार मीम शेअर केले होते. ज्यांनी ज्यांनी द अंडरटेकरला हरवलंय, त्यांनी त्यांनी हात वर करा, अशा आशयाचे हे मीम होते आणि त्याखाली कोलाजमध्ये अनेकांचे फोटोही होते. यात अक्षय कुमारचाही हात वर केलेला फोटो होता. आता यावर खुद्द अंडरटेकरचाही रिप्लाय आलाये. होय, अक्षय कुमारने हात वर केलाच आहे आणि आता अंडरटेकरही रिअल मॅचसाठी सज्ज झालाय.‘होय, तू रिअल रिमॅचसाठी तयार झालास की मला सांग...’, असा रिप्लाय अंडरटेकरनं अक्षयच्या या मीमवर केला आहे. डब्ल्यूडब्ल्यूई इंडियाने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर अंडरटेकरने अक्षयला दिलेल्या रिप्लायचे ट्विट शेअर केले आहे. रिअल अंडरटेकर विरूद्ध अक्षय कुमार, होऊन जाऊ द्या, असे हे ट्विट शेअर करताना डब्ल्यूडब्ल्यूई इंडिया लिहिले आहे.
अक्कीनं अंडरटेकरला हरवलंच नव्हतं...!!
‘खिलाडियों का खिलाडी’ चित्रपटात अक्षय कुमारने फाईटमध्ये द अंडरटेकरला हरवल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र अलीकडे अक्षय कुमारने या चित्रपटातलं एक सत्य समोर आणलं होतं.‘खिलाडियों का खिेलाडी चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने तुम्हा सर्वांना प्रफुल्लित करणारी मजेदार सत्य हे आहे की, या चित्रपटात द अंडरटेकरची भूमिका रेसलर ब्रायन ली याने केली होती,’ असे अक्षयने लिहिले होते. म्हणजेच काय तर या चित्रपटात अक्षय कुमारने ज्याला हरवलं होतं तो द अंडरटेकर नसून त्याची भूमिका करणारा रेसलर ब्रायन ली होता.अक्षय कुमारची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच लाखो लोकांनी या पोस्टला लाइक केलं होतं.