Join us

‘The Kashmir Files’वर यामी गौतम म्हणाली - 'सत्य जाणून घेण्यासाठी आम्हाला 32 वर्षे आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 4:30 PM

यामी आपल्या ट्विटमध्ये म्हणाली, काश्मीरी पंडितांनी काय अत्याचार सहन केला आहे, हे देशातील बहुतांश लोकांना माहिती नाही.

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा नुकताच रिलीज झालेला 'द काश्मीर फाइल्स' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने केवळ चार  43.5 कोटींचा गल्ला जमवत  शाहीद कपूरचा ब्लॉकबस्टर 'कबीर सिंग', अक्षय कुमारचा 'रुस्तम', अजय देवगणचा 'शिवाय' आणि शाहरुख खानच्या 'रा वन'ला मागे टाकलं आहे. दरम्यान, अभिनेत्री यामी गौतम आणि तिचा पती-चित्रपट निर्माता आदित्य धर यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या  दिग्दर्शन "द काश्मीर फाईल्स" ला आपला पाठिंबा दर्शविला आहे, ज्याने 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची वेदनादायक कथा उलगडली आहे.

यामीने गेल्या वर्षी दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले. आदित्यचा जन्म एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला, त्यामुळे द काश्मीर फाइल्सवर यामीचे मत महत्त्वाचे आहे. यामी म्हणाली- 'मी एका काश्मिरी पंडिताशी लग्न केले आहे, त्यामुळे मला माहीत आहे की या शांतताप्रिय समुदायाने कसा अत्याचार सहन केला आहे. मात्र देशातील बहुतांश लोकांना याबाबत माहिती नाही. सत्य जाणून घेण्यासाठी आम्हाला ३२ वर्षे आणि चित्रपटची गरज  लागली. 

ट्विटरवर रिव्ह्यू शेअर करत आदित्यने लोकांना तो पाहण्याचे आवाहन केले आहे. आदित्य लिहितो, "'द कश्मीर फाइल्स' पाहिल्यानंतर तुम्ही सिनेमागृहात काश्मिरी पंडितांचे रडतानाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. ही भावना खरी आहे. यातून दिसून येते की एक समुदाय म्हणून आम्ही आमच्या वेदना किती काळ दाबून ठेवल्या आहेत. आम्हाला रडण्यासाठी खांदा नव्हता. आणि आमच्या विनवणी ऐकण्यासाठी कोणाचे कानही उडते नव्हते."

द कश्मीर फाइल्स' चित्रपटाची निर्माती अभिषेक अग्रवाल   आणि विवेक रंजन अग्निहोत्री  यांनी केली आहे. मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक या कलाकारांनी या  चित्रपटात  महत्वाची भूमिका साकारली आहे. 

 

टॅग्स :द काश्मीर फाइल्सयामी गौतमअनुपम खेर