Join us  

मुलाच्या जन्माच्या चार महिन्यानंतर कामावर परतली यामी गौतम, म्हणाली - "आणि आता मी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 12:40 PM

Yami Gautam : यामीने ४ जून २०२१ रोजी चित्रपट निर्माता आदित्य धर यांच्याशी लग्न केले. नुकतेच हे दाम्पत्य एका मुलाचे पालक झाले आहे. आई झाल्यानंतर काही महिन्यांनी यामीनेही कामावर परतण्याची घोषणा केली आहे.

यामी गौतम (Yami Gautam) ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनय कौशल्यासाठी आणि रुपेरी पडद्यावर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रयोग करण्याची क्षमतेसाठी तिचे कौतुक केले जाते. यामीने ४ जून २०२१ रोजी चित्रपट निर्माता आदित्य धर यांच्याशी लग्न केले. नुकतेच हे दाम्पत्य एका मुलाचे पालक झाले आहे. आई झाल्यानंतर काही महिन्यांनी यामीनेही कामावर परतण्याची घोषणा केली आहे.

यामी गौतमने १० मे २०२४ रोजी मुलगा वेदाविदला जन्म दिला. आईच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तिने आपले वैयक्तिक आयुष्य मीडियापासून दूर ठेवले होते. सोशल मीडियावरही ती कमी सक्रिय होती. पण २७ सप्टेंबर २०२४ रोजी यामीने शहरातील एका कार्यक्रमात सहभागी होत असताना तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली.

यामीने सोशल मीडियावर आरशात तयारी करतानाचा फोटो शेअर केला आहे. यात तिने अंजना बोहराने डिझाइन केलेले एथनिक लाल ड्रेस आणि झुमके घातलेले दिसत आहेत. हलका मेकअप आणि खुल्या केसांनी तिने आपला लूक परिपूर्ण केला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "आणि आता मी कामावर परत आले आहे, या अद्भुत कार्यक्रमासाठी मेक माय ट्रिप टीमचे आभार."

यामी गौतम वर्कफ्रंटवर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यामीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि चांद के पार चलोद्वारे तिने टीव्हीवर प्रवेश केला. उल्लास उत्साह या कन्नड चित्रपटातून तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर तिला विकी डोनरमध्ये मुख्य भूमिका मिळाली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर तिने बदलापूर, सनम रे, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, भूत पोलिस, चोर निकल के भागा आणि इतर चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. अभिनेत्री शेवटची कलम ३७० मध्ये दिसली होती.

टॅग्स :यामी गौतम