Join us

झटपट एका दिवसात उरकलं यामी गौतमचं लग्न! वेडिंग प्लानरला सुद्धा नव्हती कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 17:11 IST

Yami Gautams wedding : यामी व आदित्यच्या लग्नाची बातमी सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. अगदी यामी व आदित्यचा वेडिंग प्लॅनर गितेश शर्मा याची स्थितीही काहीशी अशीच होती.

ठळक मुद्देयामी व आदित्यची पहिली भेट ‘उरी’च्या सेटवर झाली होती. याच सेटवर आधी मैत्री झाली आणि मग दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने  (Yami Gautam) गत 4 जूनला दिग्दर्शक आदित्य धरसोबत (Aditya Dhar) लग्नगाठ बांधली. गेल्या शुक्रवारी अचानक यामीच्या लग्नाचा फोटो समोर आला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण यामी व आदित्य लग्न करणार, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. दोघांनीही लग्नचं काय तर रिलेशनशिपही जगापासून लपवून ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाची बातमी सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. अगदी यामी व आदित्यचा वेडिंग प्लॅनर गितेश शर्मा याची स्थितीही काहीशी अशीच होती. कारण लग्नाच्या अगदी एक दिवस आधी त्याला या लग्नाची माहिती देण्यात आली होती. तुला वेडिंग प्लान करायचे आहे, असे त्याला सांगण्यात आले होते.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत गीतेश शर्माने स्वत: ही माहिती दिली. त्याने सांगितले, यामीच्या वडिलांचा मला फोन आला होता. लग्न आहे आणि तयारी करायचीये, असे त्यांनी मला सांगितले. उद्या लग्न आहे म्हणताना मला फोन आला होता. यामी व आदित्य दोघांनाही कुठलाही बडेजाव नको होता. त्यांना अगदी सिंपल लग्न हवे होते. अगदी पारंपरिक पद्धतीने दोघांना लग्न करायचे होते. गावात होतात तसे अगदी साधेसुधे लग्न हवे असल्याने आम्ही तयारी सुरू केली.

पुढे त्याने सांगितले, देवदार वृक्षाच्या खाली आदित्य व यामी यांनी लग्नगाठ बांधली. मंडप झेंडूच्या फुलांनी व केळीच्या पानांनी सजवण्यात आला होता. गोल्ड व व्हाईट थीम होती. संध्याकाळी एक छोटीशी रिसेप्शन पार्टीही आयोजित केली गेली होती. यात फक्त त्यांच्या कुटुंबाचे लोक होते.

अंगणातच यामीला हळद लागली, तिथेच मेहंदी सेरेमनी झाली. भोजनाची व्यवस्थाही अगदी साधी होती. अगदी पारंपरिक पक्वानांची पंगत होती.यामी व आदित्यची पहिली भेट ‘उरी’च्या सेटवर झाली होती. याच सेटवर आधी मैत्री झाली आणि मग दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण या प्रेमाची चर्चा कुठेही नव्हती. कारण यामी व आदित्यने याचा थांगपत्ताही कुणाला लागू दिला नव्हता.

टॅग्स :यामी गौतम