Join us

'ही तर फक्त सुरुवात..' पठाणच्या सिक्वलची उत्सुकता, तर टायगरमध्येही 'शाहरुख'ची एंट्री होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 12:46 PM

यशराज फिल्म्सने पठाणच्या माध्यमातून स्पाय युनिव्हर्सची घोषणा केली आहे.

Pathaan 2 : शाहरुखचा (Shahrukh Khan) पठाणचा रिलीज झाला आणि सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. दोनच दिवसात चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली आहे. पठाण रिलीज आधी चांगलाच वादात अडकला होता. मात्र त्या कशाचाच परिणाम पठाणवर झालेला नाही. पठाणची आणखी एक बाजू ती म्हणजे सिनेमात असलेला टायगर म्हणजेच सलमान खानचा (Salman Khan) कॅमिओ. यशराज फिल्म्सने (YRF) पठाणच्या माध्यमातून स्पाय युनिव्हर्सची घोषणा केली आहे. त्यामुळे आता टायगर ३ (Tiger 3) मध्ये पठाणचा कॅमिओ असण्याचीही शक्यता आहे. याशिवाय पठाणचेही सिक्वल येणार हे जवळपास निश्चितच झाले आहे.

ज्यांनी पठाण सिनेमा बघितला असेल त्यांना अंदाजा आलाच असेल की पठाणचे पुढचे भाग येत्या काही वर्षात येतील. पठाण मध्ये कॅमिओ रोल मध्ये आलेला टायगर म्हणतो, 'टायगर एका मोठ्या मिशनवर जाणार आहे . पठाणला जीवंत राहावं लागेल'. यातून हेच स्पष्ट होते की टायगर मध्ये पठाण ची एंट्री होणार.

तर दुसरीकडे पठाणच्या शेवटच्या सीनमध्ये आशुतोष राणाने पठाण ला मोठी जबाबदारी दिली आहे. पठाण ला आता त्याची स्वत:ची टीम उभी करायची आहे.त्यासाठी तो तयारीला लागणार आहे. त्यामुळे देशाचे रक्षण करण्यासाठी पठाण पुन्हा येणार हेच स्पष्ट होतंय.

चार वर्षानंतर परतलेल्या किंग खानने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने 'KGF-2'सह अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड तोडला आहेत. पहिल्या दिवशी सूमारे 57 कोटींची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत कमालीची वाढ झाली. 'पठाण'ने दुसऱ्या दिवशी(दि. 26) तब्बल 70 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या जबरदस्त कमाईने व्यापार विश्लेषकांही चकीत केले आहे. किंग खानच्या चित्रपटाने दोन दिवसांत 127 कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानसलमान खान