KGF 2 WW Box Office collection : ‘केजीएफ 2’ सूसाट...! चारच दिवसांत छप्परफाड कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 03:48 PM2022-04-18T15:48:57+5:302022-04-18T15:52:09+5:30
KGF Chapter 2 WW Box Office collection day 4 : ‘केजीएफ 2’ त्सुनामी बनून बॉक्स ऑफिसवर धडकला आहे आणि ही त्सुनामी ‘आरआरआर’पेक्षाही विराट असल्याचं चित्र आहे.
KGF Chapter2 WW Box Office : साऊथ सुपरस्टार यशचा ( yash ) ‘केजीएफ 2’ ( KGF Chapter2 )बॉक्स ऑफिसवर सूसाट पळतोय. होय, पहिल्या दोनच दिवसांत जगभरात 270 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने रविवारपर्यंत 550 कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस केला आहे. अगदी ‘केजीएफ 2’ त्सुनामी बनून बॉक्स ऑफिसवर धडकला आहे आणि ही त्सुनामी ‘आरआरआर’पेक्षाही विराट असल्याचं चित्र आहे. ‘आरआरआर’ने काहीच दिवसांपूर्वी वर्ल्डवाईड 1000 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली होती. अद्यापही आरआरआर गर्दी खेचतोय. पण त्याच्यामागून आलेला ‘केजीएफ 2’ या सिनेमाच्या कमाईचा वेग चकीत करणारा आहे. चारच दिवसांत या सिनेमाने 500 कोटींचा आकडा पार केला आहे.
#KGFChapter2 WW Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) April 18, 2022
CROSSES ₹500 cr milestone mark in just 4 days.
Day 1 - ₹ 165.37 cr
Day 2 - ₹ 139.25 cr
Day 3 - ₹ 115.08 cr
Day 4 - ₹ 132.13 cr
Total - ₹ 551.83 cr
#2 at the global box office after fantastic beasts. #Yash#KGF2
चारच दिवसांत 500 कोटींपार
ट्रेड अॅनालिस्ट मनोबाला विजयबालनने ‘केजीएफ 2’च्या कमाईचे ताजे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार, या चित्रपटाने फक्त चार दिवसांत जगभरात 552 कोटींचा बिझनेस केला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 165.37 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 139.25 कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी 115.08 कोटींचा बिझनेस केला आणि चौथ्या दिवशी म्हणजेच काल रविवारी 132.13 कोटींचा गल्ला जमवला. हा एकूण आकडा 551.83 कोटी आहे.
R#KGF2 CREATES HISTORY AGAIN... FASTEST TO ENTER ₹ 200 CR CLUB...
— taran adarsh (@taran_adarsh) April 18, 2022
⭐ #KGFChapter2: Will cross ₹ 200 cr today [Mon, Day 5]
⭐ #Baahubali2: Day 6#KGF2 is REWRITING RECORD BOOKS... Thu 53.95 cr, Fri 46.79 cr, Sat 42.90 cr, Sun 50.35 cr. Total: ₹ 193.99 cr. #India biz. #Hindi. pic.twitter.com/ysKnW2zIuV
भारतातही छप्परफाड
भारतातही चित्रपटाने धमाका केला आहे. ‘केजीएफ 2’च्या हिंदी व्हर्जनचे आकडेही थक्क करणारे आहेत. तीनच दिवसांत ‘केजीएफ 2’च्या हिंदी व्हर्जनने 143.64 कोटींची कमाई केली. काल रविवारी या चित्रपटाने 50.35 कोटींचा बिझनेस केला. या ‘केजीएफ 2’ने हिंदीत सलग चार दिवस 40 कोटींहून अधिक कमाई करण्याचा नवा विक्रम नोंदवला आहे. अवघ्या दोन दिवसांत शतक ठोकणारा हिंदीत रिलीज झालेला हा पहिला चित्रपट ठरला आहे. चार दिवसांत ‘केजीएफ 2’च्या हिंदी व्हर्जनने 193.99 कोटींची बक्कळ कमाई केली आहे. आज सोमवारी हा सिनेमा 200 कोटींचा आकडा पार करेल अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे. अन्य भाषेतही या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.