Join us

यशने सुरू केलं 'रामायण'चं शूटिंग, दिसणार रावणाच्या भूमिकेत, परिधान करणार खरे सोन्याचे कपडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:14 IST

Actor Yash : कन्नड सुपरस्टार यशने रणबीर कपूर आणि साई पल्लवी स्टारर 'रामायण' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. नितीश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात यश 'रावण'च्या भूमिकेत दिसणार आहे.

कन्नड सुपरस्टार यश(Actor Yash)ने रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) स्टारर 'रामायण' (Ramayan Movie) या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. नितीश तिवारी (Nitiesh Tiwari) दिग्दर्शित या चित्रपटात यश 'रावण'च्या भूमिकेत दिसणार आहे. 'रामायण'मध्येरणबीर कपूर रामाची भूमिका साकारत आहे, तर साई पल्लवी सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणबीर आणि साई पल्लवी यांनी यापूर्वीच मुंबईत त्यांचे भाग शूट केले आहेत. आता यशनेही त्याच्या भागाचे शूटिंग सुरू केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यश २१ फेब्रुवारीला शूटिंग सेटवर पोहोचला आणि दोन दिवसांच्या कॉश्च्युम ट्रायलनंतर शूटिंगला सुरुवात केली. सध्या त्यांच्या शूटिंगचा फोकस युद्धाच्या दृश्यांवर आहे, जो मुंबईतील अक्सा बीचवर शूट होणार आहे. यानंतर चित्रपटाचे पुढील चित्रीकरण दहिसर येथील स्टुडिओमध्ये होणार आहे. या चित्रपटात युद्धाची दृश्ये मोठ्या प्रमाणावर चित्रित केली जात आहेत. ॲक्शन कोरिओग्राफी जबरदस्त आहे. या दृश्यांमध्ये ग्रीन स्क्रीन तंत्रज्ञान आणि व्हीएफएक्सचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. रणबीर कपूर या टप्प्यात सहभागी होणार नाही, कारण त्यात राम आणि रावण यांच्यात समोरासमोर भांडणाचे दृश्य नाही.

सोन्याच्या जरीपासून बनवले जाणार यशचे कपडेहरप्रीत आणि रिंपल यांनी डिझाइन केलेल्या या चित्रपटात यश खास वेशभूषेत दिसणार आहे. विशेष म्हणजे त्याचे कपडे खऱ्या सोन्याच्या ब्रोकेडचे आहेत. पौराणिक कथेनुसार, रावणाचे राज्य लंका हे सोन्याचे शहर मानले जात होते, त्यामुळे चित्रपटातील त्याच्या कपड्यांची रचनाही त्यानुसार करण्यात आली आहे.

'रामायण'मध्ये दिसणार हे कलाकार?‘रामायण’ दोन भागात तयार होत आहे. पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये रिलीज होईल, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये रिलीज होईल. यशसोबतच 'रामायण'मध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, लारा दत्ता, सनी देओल आणि इंदिरा कृष्णा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :यशरणबीर कपूरसाई पल्लवीरामायण