Yashoda Box Office Collection Day 4: अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा 'यशोदा' चित्रपट थिएटरमध्ये धमाकेदार कमाई करत आहे. सरोगसी घोटाळ्यावर आधारित 'यशोदा'ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ओपनिंग वीकेंडला या चित्रपटाने 10 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
'यशोदा' भारतातच नाही तर परदेशातही चांगली कमाई करतो आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये यूएसमध्ये 445K डॉलर्सची कमाई केली आहे. दुसरीकडे, भारतातील 'यशोदा'च्या चौथ्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल सांगायचे तर, सोमवारी, 14 नोव्हेंबर रोजी, चित्रपटाने भारतात 1.35-1.45 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. यासोबतच चित्रपटाचे एकूण कलेक्शन 12 कोटींच्या आसपास पोहोचले आहे. तसेच, 'यशोदा' या वीकेंडला यूके बॉक्स ऑफिसवर नंबर 1 भारतीय चित्रपट राहिला.
समंथा रुथ प्रभूच्या चित्रपटाने चांगली सुरुवात केली आणि पहिल्या दिवशी 3.06 कोटींची कमाई केली. शनिवारी या चित्रपटाने 3.64 कोटींची कमाई केली. दुसरीकडे, रविवारपर्यंतच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 3.50 कोटींचा गल्ला जमावला आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 10.20 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट महिला स्टार अभिनीत असलेला पहिला संपूर्ण भारतातील चित्रपट आहे.
चित्रपटात सामंथा एका सरोगेट आईची भूमिका साकारत आहे जी वैद्यकीय क्षेत्रात सुरु असलेल्या घोटाळा उघडकीस आणते. 'यशोदा'(Yashoda)चे दिग्दर्शन हरीश नारायण आणि के. हरिशंकर यांच्या जोडीने केली आहे. 'यशोदा' व्यतिरिक्त समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) तिच्या 'शाकुंतलम' आणि 'कुशी' या चित्रपटांमुळेही चर्चेत आहे. शकुंतलम हा कालिदासाच्या प्रसिद्ध नाटक शकुंतलावर आधारित पीरियड ड्रामा चित्रपट आहे.